तेलगंणाच्या व्यक्तीचा भन्नाट जुगाड! तयार केली वीजेशिवाय चालणारी लाकडी ट्रेडमिल

 Telangana man created a wooden treadmill running without electricity
Telangana man created a wooden treadmill running without electricity

Jugaad Treadmill Viral Video: जगामध्ये कौशल्याची कमी नाही. काही लोक कौशल्य दाखविण्याची संधी मिळते तर काही लोकांना मिळत नाही. अशा लोकांकडे कौशल्य असूनही ते अज्ञात असतात. दरम्यान अशाच तेलंगणाच्या( Telangana) एका व्यक्तीने आपल्या कौशल्य दाखवून लाकडापासून ट्रेडमिल बनवले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मिीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे सगळीकडे कौतूक होत आहे. तेलंगणाच्या मंत्र्यांनी देखील या व्यक्तीचे कौतूक केला आहे.

 Telangana man created a wooden treadmill running without electricity
'ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी' म्हणजे काय? एक कपंनी कमावतेय कोटी रुपये

गरज ही शोधाची जननी आहे अशी जुनी म्हण आहे. त्यामुळे एक व्यक्तीने लाकडाचे ट्रेडमिल तयार केले आहे. आपल्याला माहित आहे की ट्रेडमिल वीजेवर चालते. बहूतेक लोक आज काल व्यायामासाठी ट्रेडमिलचा वापरत करतात. पण जिथे विज नाही तिथे कशी सुरू ट्रेडमिल वापरता येणआर नाही. पण, तेलंगणामधील या व्यक्तीने जुगाड करून ट्रेडमिल तयार केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकतो की कशाप्रकारे ट्रेडमिलवर चालण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यक्तीने स्वत: ट्रेडमिल तयार केली आहे तेही वीजेशिवाय.

 Telangana man created a wooden treadmill running without electricity
TB Champions : 5 मुली भारताला करणार टीबीमुक्त, 'अशी' करतायेत जनजागृती

जुगाड लावून तयार केले ट्रेडमिल

हे ट्रेडमिल पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ''हे कसे काय शक्य आहे?'' पण हा जुगाड पाहून लोक विचारात पडले आहे. तेलंगानाचे मंत्री KTR यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे असून ''ही खूप चांगली कल्पना आहे. या कल्पनेला पुढे नेण्याची गरज आहे.'' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोशल मिडियावर सामान्य लोक 'हा खूप चांगला जुगाड आहे.'' तरकाही लोकांचे म्हणणे आहे की, या व्यक्तीने खरंच कमाल केली आहे. ''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com