salary |कंपनीने दिला १.४३ कोटी रुपये एवढा पगार, मग झाला कर्मचारी फरार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

employee

कंपनीने दिला १.४३ कोटी रुपये एवढा पगार, मग झाला कर्मचारी फरार...

मुंबई : हा कर्मचारी Consorcio Industrial de Alimentos (Cial) नावाच्या कंपनीत काम करत होता. त्याला त्या कामाचा मोबदला म्हणून कंपनी ५००००० चिली पेसोस म्हणजे सुमारे ४३.४ हजार रुपये इतका पगार देत होती. एक दिवस अचानक कपंनीकडून चुकून १६५,३९८,८५१ चिली पेसोस म्हणजे १.४३ कोटी रुपये कर्मचाऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर झाले.

हेही वाचा: Indian Army Agniveer Bharti : अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू

प्रत्येक कर्मचारी हा आपल्याला पगार मिळावा म्हणून काम करत असतो, महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार होताच प्रत्येक जण हा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी विकत घेण्यासाठी पगार खर्च करतो. अनेक वेळा असे घडते की, कंपनी कर्मचाऱ्यांच्या कामावर खूश होऊन त्यांना बोनस देते.

पण तुम्हाला माहीत आहे का एका व्यक्तीचे नशीब इतके बलवान आहे की कंपनीने त्याच्या बँक खात्यात १.४३ कोटी रुपये जमा केले आहेत. मात्र या व्यक्तीचा दरमहा पगार हा ४३ हजार रुपये होता. इतके पैसे आपल्या खात्यावर अचानक आल्यामुळे ती व्यक्ती खूप खुश झाली.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, हे प्रकरण चिलीचे आहे. चिली येथील Consorcio Industrial de Alimentos या कंपनीने एका व्यक्तीला त्याच्या एका महिन्याच्या पगारापेक्षा २८६ पटीने जास्त पैसे पाठवले. एवढे पैसे खात्यावर जमा होताच हा कर्मचारी गायब झाला आहे.

हा कर्मचारी Consorcio Industrial de Alimentos (Cial) नावाच्या कंपनीत काम करत होता. कंपनी त्याला कामाचा मोबदला म्हणून ५००००० चिली पेसोस म्हणजे सुमारे ४३.४ हजार रुपये पगार देत असे. एक दिवस नजर चुकून १६५३९८८५१ चिली पेसोस म्हणजे १.४३ कोटी रुपये कर्मचाऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.

एका दुसऱ्या कर्मचाऱ्याने जेव्हा पैसे आलेल्या कर्मचाऱ्याचे खाते पाहिले तेव्हा तो चक्रावून गेला की ऐवढी मोठी रक्कम याच्या खात्यात कशी काय आली? त्याने लगेच आपल्या एटीआरला ही माहिती दिली, कर्मचाऱ्याने स्वत: एचआरच्या डेप्युटी मॅनेजरशी संपर्क साधला आणि या गोष्टीविषयी सविस्तर माहिती दिली.

तोपर्यंत खात्यावर पैसा जमा झालेला कर्मचारी हा राजीनामा देऊन गायब झाला होता. पुढे कंपनीने कर्मचाऱ्याला पैसे परत करण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने बँक आणि कंपनीला आश्वासन दिले की तो सर्व पैसे परत करेल, परंतु अचानक त्या व्यक्तीने कंपनीकडे राजीनामा दिला आणि गायब झाला.

या बातमीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोक म्हणत आहेत की त्या व्यक्तीने बरोबर केले, तर अनेक लोक म्हणाले की त्या व्यक्तीने चुकीचे केले. आता तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं ते नक्की सांगा.

Web Title: The Company Paid A Salary Of Rs 143 Crore Then The Employee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :companyEmployeessalary
go to top