Weight Loss Journey: IPSनं 9 महिन्यातच घटवलं तब्बल 43 किलो वजन... कसं शक्य झालं

विवेक राज यांचा वजन कमी करण्याचा प्रवास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
vivek raj singh kukrele
vivek raj singh kukrelesakali

एक म्हण आहे, 'जब जागो, तभी सवेरा...' ही म्हण भारतीय पोलीस सेवा (IPS) विवेक राज सिंह कुकरेला यांनी खरी करून दाखवली आहे. विवेक राज नॅशनल पोलिस अकादमीच्या प्रशिक्षणात सहभागी झाले तेव्हा त्यांचे वजन १३४ किलो होते.

त्यानंतर विवेक यांनी वजन कमी करण्यासाठी केलेल्या मेहनतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी बोलताना विवेक राज यांनी सांगितले की, ते फक्त चालण्याने कसे फिट झाले.

आठवीमध्ये वजन 88 किलो होते

त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फिटनेसच्या प्रवासाविषयी माहिती शेअर करताना, आयपीएस विवेक म्हणाले की, त्यांचे वजन लहानपणापासूनच खूप जास्त होते आणि ते आठवीत असताना त्यांचे वजन 88 किलोपर्यंत पोहोचले होते.

यानंतर जेव्हा त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली तेव्हा प्रशिक्षणात सहभागी होताना त्यांचे वजन १३४ किलो होते. एनपीए प्रशिक्षणादरम्यान त्यांनी फिटनेसवर काम केले तेव्हा वजन 104 किलोपर्यंत कमी झाले. यानंतर त्यांना अशी प्रेरणा मिळाली की त्यांनी फिटनेसवर काम सुरू ठेवले.

vivek raj singh kukrele
Mediterranean diet: हा आहार खाणं काय अन् दिवसाला चार हजार पाउलं चालणं काय सारखचं...आहे जबरदस्त फायदा

वजन 138 किलो होते

बिहारच्या नक्षल भागात पोस्टिंगदरम्यान त्यांचे वजन १३८ किलोपर्यंत वाढले होते. यामागचे कारण सांगताना विवेक सांगतात, 'मी खूप फुडी आहे, खूप खायचो, अन्न वाया जाऊ नये हा आमचा उद्देश आहे.'

यानंतर त्यांनी मॉर्निंग वॉक सुरू केला जो त्यांनी त्यांचा रुटीन म्हणून सुरु केले. इतकेच नाही तर विवेक यांनी आपल्या आहाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यामुळे विवेक यांचे आतापर्यंत ४३ किलो वजन कमी झाले आहे.

जेव्हा विवेक यांनी त्यांचे वजन कमी करण्याची स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली तेव्हा ती लगेच व्हायरल झाली. आतापर्यंत या स्टोरीला अनेक लोकांनी लाईक केले आहे तर मोठ्या संख्येने लोक कमेंट करत आहेत. त्यांची वजन कमी करण्याची कहाणी लोकांना प्रेरणा देणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com