नवरदेवासाठी हे कपडे सध्या ट्रेडिंगमध्ये...

Updated on

लग्नात स्टाईलिश दिसण्यासाठी मुलींना अनेक पर्याय असतात. एथनिक ड्रेसपासून साड्यांपर्यंत, कुर्ता ते शराऱ्यापर्यंत अनेक गोष्टी त्या घालू शकतात. पण मुलांसाठीही लग्नात एथनिक कपड्यांचे विविध पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मुलांकडे मुलींसारखे खूप पर्याय नसले तरी काही स्टाईल्समुळे ते एकदम हॅंडसम वाटतील. सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. ज्या मुलांचे लग्न या काळात होणार आहे त्यांना आयुष्य़ातील महत्वाच्या प्रसंगात सर्वोत्तम दिसायचे असेल ते एथनिक कपड्यांचा विचार करू शकतात. त्यासाठी शेरवानी हा उत्तम पर्याय आहे. सध्या शेरवानीमध्येही वेगवेगळे ट्रेंड बघायला मिळत आहेत.

तुम्ही तुमच्या शेरवानीसाठी रंगापासून प्रिंट आणि स्टाइलचे वेगवेगळे पर्याय शोधू शकता. सी ग्रीन कुर्त्यावर एम्ब्रॉयडरी केलेले कुर्ते सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. यावर तुम्ही मॅचिंग पँट आणि स्टोल सोबत कॅरी करता येईल.

पांढऱ्या किंवा क्रीम रंगाच्या शेरवानीचा विचार तुम्हाला करता येईल. त्यावर लाल रंगाची शाल तुम्हाला वेगळा लूक देईल. तसेच या ड्रेसवर तुम्ही मोठी मोत्याची माळ नक्की घाला.

वेलवेट किंवा अशा प्रकारच्या फेब्रिक कुर्ता घालून तुमचा लूक रॉयल आणि क्लासी वाटेल. प्लेन कुर्ता किंवा शेरवानी बरोबर तुम्ही प्रिंटेड किंवा एब्रोयडरी केलेला स्टोल पेयर करू शकता.

मॅचिंग शेरवानीचा ट्रेंड हा कायम राहणारा आहे. या शेरवानीमध्ये तुम्ही नेकलाईनसह डार्क किंवा लाईट रंगाचे कुर्ते आणि पॅंट घालू शकता. शेरवानीबरोबर स्टोलही वापरता येईल. यामुळे तुमचा लूक स्टाईलीश वाटेल.

लग्नाच्या पार्टीसाठी साध्या ते एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड शेरवानीपर्यंत तुम्हाला बाजारात अनेक पर्याय मिळतील. पँटच्या स्टाईलपासून ते दुपट्ट्याच्या पॅटर्नपर्यंतही प्रकार पाहायला मिळतील. मात्र तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ते कॅरी करता त्यावरून तुम्ही तुमचा लुक स्टायलिश बनवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com