साडीमध्ये स्लिम दिसायचं आहे? फॉलो करा या टिप्स

फॅशन आणि सौंदर्याच्या या दुनियेत जवळजवळ प्रत्येकालाच सुंदर दिसण्याची इच्छा असते.
Saree for Slim Look
Saree for Slim Look esakal
Summary

फॅशन आणि सौंदर्याच्या या दुनियेत जवळजवळ प्रत्येकालाच सुंदर दिसण्याची इच्छा असते.

फॅशन (Fashion) आणि सौंदर्याच्या या दुनियेत जवळजवळ प्रत्येकालाच सुंदर दिसण्याची इच्छा असते. पण बहुतांश लोकांना फिगरमुळे आवडता ड्रेस घालता येत नाही आणि साडीही (Saree) त्यातीलच एक आहे. होय, स्लीम तरुणींनाच साड्या चांगल्या दिसतात असं अनेकांचं मत आहे. त्यामुळेच वजन (Weight) जास्त असल्यामुळे अनेक महिला साडी नेसणं टाळतात. पण तुम्हाला माहितेय का, लठ्ठ लोकही काही खास टिप्स फॉलो करून साडीमध्ये स्लिम दिसू शकतात.

खरं तर साडी ही भारतीय सभ्यता आणि परंपरेचं प्रतीक मानली जाते. त्याचबरोबर देशातील प्रत्येक महत्त्वाच्या सणाला किंवा प्रसंगी साडी नेसण्याची प्रथा शतकानुशतके रूढ झाली आहे. पण आधुनिकतेच्या या युगात महिलांना आपला लठ्ठपणा लपवण्यासाठी साडी नेसणे आवडत नाही. मात्र साडीमध्ये स्लीम आणि अत्यंत सुंदर दिसण्यासाठी तुम्ही ब्लाऊज वापरण्यामध्ये काही बदल करू शकता.

Saree for Slim Look
ब्लाउजऐवजी कुर्ती, टॉप अन् जॅकेटवर नेसा साडी! राहा स्टायलिश

फिटिंग्जकडे लक्ष द्या:

वजन (Weight) लपवण्यासाठी अनेक स्त्रिया सैलसर ब्लाऊज शिवतात. यामुळे साडीचा लूक खराब होतोच, पण ते पाहूनही अगदी विचित्र वाटतं. पण त्याचबरोबर तुम्ही जर हेल्दी असाल तर फिटिंग्ज ब्लाउज तुमच्यावर मस्त दिसतो. अशावेळी कुणीही तुमच्या वजनाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे फक्त ब्लाऊज फिटिंग्ज शिवून घ्या.

मोठे स्ल्यूजकडे लक्ष द्या:

आजकाल मोठे स्ल्यूज वापरण्याचा ट्रेंड फॉलो केला जात आहे. अशावेळी ब्लाउजचे स्ल्यूज लांब ठेवून तुम्ही सहजपणे तुमचा लठ्ठपणा लपवू शकता आणि प्रत्यक्ष वजनापेक्षा खूपच स्लीम दिसू शकता.

Saree for Slim Look
''देवा! आता तरी अवतार घे''; ही विचित्र साडी पाहून तुम्हीही व्हाल आवाक

डीपनेक घालू नका:

अनेक महिलांना डीप नेकचा ब्लाऊज घालायला आवडतो. पण हे लक्षात ठेवा की तुमचं वजन जास्त असेल आणि कंबरेभोवती भरपूर चरबी असेल तर डीप नेक ब्लाऊज घालू नका. यामुळे तुमच्या पोटाची आणि कमरेची चरबी क्लिअर दिसते.

कॉलर बोट नेक:

बऱ्याच वेळा लठ्ठपणाने ग्रस्त लोकांमध्ये जास्त फॅटमुळे मान लहान दिसू लागते. अशा परिस्थितीत तुम्ही क्लोज-नेक कॉलर बोट नेक ब्लाउजचा पर्याय निवडू शकता. यामुळे तुमच्या साडीचा लूक सर्वात वेगळा दिसेल आणि साडीमध्ये तुम्हीही अत्यंत सुंदर अॅन्ड स्लीम दिसू शकतात.

ब्रॉड राउंड नेकलाइन:

जर तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्हाला साडीमध्ये स्लिम दिसायचं असेल. त्यामुळे तुम्ही ब्रॉड गोल नेकलाइन म्हणजेच खांद्याच्या रुंदीचा ब्लाऊज घालू शकता. ते घातल्याने साडीतील तुमचा फ्रंट आणि बॅक दोन्ही लूक सुंदर दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com