esakal | पावसाळ्यात घसरून पडायचे नसेल तर फॉलो करा टीप्स
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात घसरून पडायचे नसेल तर फॉलो करा टीप्स

पावसाळ्यात घसरून पडायचे नसेल तर फॉलो करा टीप्स

sakal_logo
By
शरयू काकडे

पावसाळा हा रोमॅटिंक सिझन समजला जातो. पाऊस आला की प्रत्येक जण आपल्या पध्दतीने मॉन्सूनचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. पण खरी गंम्मत तेव्हा येते जेव्हा आपण पावसात भिजता भिजता अचानक घसरून पडतो. कितीही हळू चालत असलो, कितीही काळजी घेतली तरी कधी पाय सटकतो आणि आपण घसरून पडतो कळतंच नाही. दुसऱ्यांना पडताना पाहून लोकांना कितीही हसू येत असले तरी स्वत:वर पडण्याची वेळ आल्यावर मात्र रडू कोसळल्याशिवाय राहत नाही.

कित्येकदा पावसाळ्यात होणाऱ्या या धडपडीमुळे मोठी दुखापत होऊ शकते. कित्येकदा पावसामुळे निसरडा झालेल्या रस्त्यावर गाड्याही धप्पा धप्प आपटतात. त्यामुळे गंभीर वेदनादायक जखम, मुरगळा, फ्रॅक्चर असे काहीही होऊ शकते. तुम्हाला घाबरविण्याचा मुळीच हेतू नाही पण काळजी घ्यायला काय हरकत आहे. पावसाळ्यात अचानक पडण्यामागे अनेक कारणे असून शकतात. कित्येकदा आपली पायतील चप्पल किंवा सँडल चूकीचे असून शकतात, चालताना तुमचा तोल जाऊ शकतो पण, तरीही तुम्हाला पावसाळ्यात घसरून पडायचे नसेल तर कशी काळजी घेतली पाहिजे...जाणून घेऊ या.

हेही वाचा: छोटे घरही दिसेल आकर्षक! वाचा काही सोप्या टिप्स

पावसाळ्यात घसरून पडायचे नसेल तर फॉलो करा या टीप्स

 • जिन्यातून चालताना आधार घ्या.

 • अंधार असलेल्या रस्त्याऐवजी जिथे व्यवस्थि प्रकाश आहे अशा मार्गावरुन जा किंवा फ्लॅशलाईटचा वापर करा.

 • नेहमी सिल्प रेजिस्टंट शूज किंवा चप्पलांचा वापर करा. ओल्या जमीनीवरुन चालणे टाळा. रबरचे सोल असलेले शूज वापरा.

 • चालताना सावधपणे चाला.

 • रस्त्यावरून चालताना फोनचा वापर टाळा

 • पादचारी मार्गाचा नेहमी वापर करा.

 • बिल्डिंगमध्ये किंवा घरात प्रवेश करताना ओले पाय मॅटला व्यवस्थित पूसावे.

 • छोटी डबक्याच्या आसपास किंवा पार्किंगमधील ओले असेलल्या भागावरुन चालणे टाळा

 • डोळे तापासून घ्या म्हणजे जवळील धोकादायक वस्तू व्यवस्थीत दिसतील.

 • स्टेंथ ट्रेनिंग घेऊन तुमचा तोल सांभाळ्याचा प्रयत्न करा

हेही वाचा: उजळ त्वचेसाठी ट्राय करा हे घरगुती उपाय

पडण्यामुळे होणाऱ्या दुखापतीचे प्रकारः

हात, मनगट किंवा कंबरेत फ्रॅक्चर, गुडघे आणि मनगट खराब होऊ शकतात, खांदा विस्कळीत होऊ शकतो, स्नायूंमध्ये मुरगळा होऊन वेदना शकतात, मणक्याचे आणि मज्जातंतूचे नुकसान, जखम किंवा सूज होऊ शकते, मेंदूला धक्का पोहचविणारी जखम, ओरखडे, स्नायू, टेंडन्स, अस्थिबंधन आणि मज्जातंतूच्या दुखापती होऊ शकतात.

हेही वाचा: वजन कमी करताना केस, त्वचेकडेही द्या लक्ष; वाचा काही सोप्या टिप्स

loading image