Gas Cylender tips : बरेच दिवस वापरल्यानंतर कसा ओळखाल शिल्लक राहिलेला गॅस

आजच्या काळात एलपीजी गॅस ही प्रत्येक घराची मुख्य गरज आहे.
gas
gassakal media
Summary

आजच्या काळात एलपीजी गॅस ही प्रत्येक घराची मुख्य गरज आहे.

प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylender) वापरलं जातं आणि आजच्या काळात एलपीजी गॅस ही प्रत्येक घराची मुख्य गरज आहे. हा गॅस सिलिंडर किती दिवस चालणार आणि कधी संपणार याचा अंदाज कुटुंबांची संख्या लक्षात घेऊनच करता येईल. काही लोकांच्या घरात एलपीजी गॅस सिलेंडर 40 ते 45 दिवस टिकतो. त्याचबरोबर काही लोकांच्या घरात 20 ते 25 दिवसांत गॅस संपत असतो.

gas
गॅस : एलपीजी की पीएनजी?

गॅस टँकमध्ये 14.2 किलो एलपीजी गॅस भरला जातो जो प्रमाणित कुटुंबासाठी 35 ते 40 दिवस टिकतो. एलपीजी गॅस कधी संपणार आहे हे कळणे शक्य नाही, अशा वेळी गॅस सिलिंडर उचलणे शक्य नसते, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस सिलिंडर कधी संपणार आहे हे शोधून काढू शकता.

गॅस सिलिंडर कधी संपणार आहे हे आपल्याला माहिती नसते. कधी कधी आपण स्वयंपाक करताना मध्येच गॅस संपतो अशी परिस्थिती निर्माण होते. अनेक वेळा असंही होतं की, रात्रीची वेळ असते आणि गॅस संपतो, पण ही ट्रिक पाळली तर यासारख्या समस्या उद्भवणार नाही.

gas
आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हॉट्सअ‍ॅपवर

सर्वात सोपी ट्रिक

गॅस सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे, हे आधी जाणून घ्यावं लागतं. त्यावेळी इतके मोठे कापड घ्या की तुमचे गॅस सिलिंडर झाकलेले असेल. कापडाला ओलं करुन पिळून घ्या. ते संपूर्ण सिलिंडरवर लपेटून घ्या आणि काही वेळाने काढून टाका. रिकामा भाग लवकर सुकेल आणि जिथे गॅस असेल तिथे तो हळूहळू सुकेल हे तुम्हाला दिसेल.तिथे तुम्ही खडूने मार्क करू शकता.

विज्ञान काय म्हणते

सिलिंडरमध्ये भरावा लागणारा एलपीजी गॅस थंड असतो आणि गॅसने भरलेला भाग तुलनेने हळूहळू सुकतो आणि ज्या भागात गॅस नाही तो भाग थोडा उष्ण भागामुळे लवकर सुकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com