घरीच करा एॅलोवेरा क्लीनअप; अशा आहेत तीन सोप्या स्टेप्स

the use of aloe vera for face beauty with three easy steps to glowing skin in kolhapur
the use of aloe vera for face beauty with three easy steps to glowing skin in kolhapur

कोल्हापूर : गरमीच्या दिवसात त्वचेला हायड्रीड ठेवणं गरजेचं असतं. जर असं केलं नाही तर त्वचा रुकी सुखी आणि बेजान होऊन जाते. काही वेळा उन्हाच्या संपर्कात आल्याने त्वचा टॅनिक होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही कोरफडचा उपयोग करू शकता. यामुळे तुमची त्वचा क्लिन होते. फक्त तीन स्टेप्समध्ये तुम्ही कोरफडीच्या मदतीने त्वचा क्लीन करू शकता.

कोरफडचा चेहऱ्याला होणारा फायदा - 

कोरफडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेड ठेवण्यासाठी मदत होते. जर गरमीच्या दिवसांत त्वचेवरील चमक कमी होत असेल तर तुम्ही कोरफडचा वापर जरूर करा. यामुळे तुमचा चेहऱ्याला ग्लो येईल. कोरफड जेलमध्ये आणि अमिनो ऍसिड असते. यामुळे त्वचा मुलायम होते. जर तुम्हाला पोर्सची समस्या असेल तर तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. यामुळे पोर्स टाईड होऊन निघून जाण्यास मदत होते.


Step-1 क्लिनिंग -

 
साहित्य -  

  • 1 मोठा चमचा एलोवेरा जेल
  • 1 मोठा चमचा ओट्स पाउडर 

कृती - 

सुरुवातीला ओट्स मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर तयार करून घ्या. ही पावडर तुम्ही एलोवेरा जेलमध्ये टाकू शकता. आता ही क्रीम तुम्ही चेहऱ्याला लावा आणि दोन मिनिटानंतर हा स्क्रब सुकल्यानंतर चेहरा धुऊन टाका.


Step-2 टोनिंग - 

साहित्य -  

  • 3 मोठे चमचे एलोवेरा जैल 
  • 1/2 कप गुलाब जल 
  • 1 मोठा चमचा लिंबू रस 
  • 1 स्‍प्रे बॉटल 


कृती - 

प्रथम बॉटलमध्ये कोरफडीचे जेल घाला. त्यानंतर त्या बाटलीत गुलाब जल आणि लिंबूचा रस घाला. ही बाटली उत्तम शेक करून घ्या आणि होमटोनरच्या मदतीने तुम्ही याचा वापरू शकता.

Step-3 मोस्चराईज -


सामग्री -

  • 1 मोठा चमचा एलोवेरा जैल 
  • 1 छोटा चमचा मध


कृती -

एका बाऊलमध्ये कोरफडची जेल आणि मध एकत्र करा. आता या दोघांच्या मिश्रणाला चेहऱ्यावर वीस मिनिटे मालिश करा आणि तसेच सोडून द्या. आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ करा.

चेहरा क्लीनअप करताना ही घ्या काळजी

क्लीनअप करत असताना काही तासांसाठी चेहऱ्याला साबणाने स्वच्छ करा. क्लीनअप नंतर चेहऱ्याला डायरेक्ट सूर्यकिरणांचा संपर्क होऊ देऊ नका. क्लीनअप नंतर फेस क्लीनअपचा वापर करा. यामुळे तुमच्या चेहऱ्याला सुरक्षा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com