Vat Punima 2023 : तुमची पहिलीच वट पौर्णिमा काय? अहोंसाठी नटा खास अन् दिसा झक्कास l vat purnima 2023 vat savitri special women saree look tips you will look gorgeous take fashion trends banarasi red saree | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vat Punima 2023

Vat Punima 2023 : तुमची पहिलीच वट पौर्णिमा काय? अहोंसाठी नटा खास अन् दिसा झक्कास

Vat Purnima 2023 Special Saree Look : पवट पौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी खास असतो. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा, शेजारच्या बायकांचं एकत्र येणं हे सगळंच फार खास असतं. ज्या विवाहित स्त्रियांची पहिलीच वट पौर्णिमा आहे त्याना या सणाची विशेष उत्सुकता असते. तसेच नव्या नवरीच्या पहिल्या वटपौर्णिमेला तिने खास नवऱ्यासाठी सजावे अशी जोडीदाराचीही अपेक्षा असते. वट पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला खास पूजा अर्चना आणि व्रत करतात.

महिला पारंपारिक आणि आकर्षक लूकसह या दिवशी घराबाहेर पडतात. मात्र तुम्हाला सगळ्यांमध्ये हटके दिसायचं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. कुठल्या साड्यांमध्ये तुम्ही हटके आणि खास दिसाल ते इथे जाणून घ्या.

बनारसी साडी

वट पौर्णिमेचा सण खास सौभाग्यवती बायकांसाठी असल्याने या महिलांना लाल, हिरवा अशा सौभाग्याचे प्रतिक दर्शवणाऱ्या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात. लाल रंगाची बनारसी साडी उठून दिसते. या साडीसह तुम्ही व्ही नेक ब्लाऊज आणि न्यूड मेकअप ठेवलात तर तुम्ही या सणासाठी अगदी परफेक्ट रेडी व्हाल. या बनारसी साडीसह सोन्याचे किंवा गोल्ड प्लेटेड दागिने घातल्यास आणखी आकर्षक दिसतात.

Vat Purnima 2023 Special Saree Look

Vat Purnima 2023 Special Saree Look

पिंक सिल्क साडी

गुलाबी रंग हा कोणत्याही महिलेव उठून दिसतो. या साडीला आणखी देखणे करण्यासाठी तुम्ही त्यावर काँट्रास्टमध्ये ब्लाऊज घालू शकता. उदा. गुलाबी साडीवर तुम्ही गडद निळ्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे ब्लाउज घालू शकता. यासह हातात मॅचिंग बांगड्या आणि सिल्व्हर कलरचे दागिने घाला.

Vat Purnima 2023 Special Saree Look

Vat Purnima 2023 Special Saree Look

हिरव्या रंगाची साडी

हिरवा रंग उर्जेचे प्रतिक असते. गोऱ्या किंवा सावळ्या रंगाच्यासुद्धा लोकांवर ही साडी अगदी उठून दिसते. हा रंग सौभाग्याचे प्रतिक मानल्या जाते. या साडीसह हिरव्या कंच बांगड्या आणि केसांत गजरा माळा. या साडीत तुम्ही लाइट मेकअपसह तयार व्हा. (Fashion)

Vat Purnima 2023 Special Saree Look

Vat Purnima 2023 Special Saree Look

दोन रंगाची डिझायनर साडी

तुम्हाला त्याच त्याच रंगाच्या साड्या घालून कंटाळा आला असेल तर तुम्ही वटपौर्णिनमेसाठी दोन रंगाच्या साड्या घालू शकता. त्याच्यासह तुम्ही काँट्रास्ट किंवा मॅचिंग रंगाचं ब्लाऊजही घालू शकता. (Vat Purnima)

वरील सर्व साड्यांसह तुम्ही वेगवेगळे डिझायनर ब्लाऊज घालू शकता. त्यासह तुम्ही अगदी झक्कास आणि सगळ्यांत हटके दिसाल.