भारतातील एका घड्याळाचे काटे फिरतात उलट्या दिशेने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anticlock

भारतातील एका घड्याळाचे काटे फिरतात उलट्या दिशेने

मुंबई : बऱ्याचदा उलट्या गोष्टी म्हटलं की आपल्याला भीती वाटायला लागते. म्हणजे एखाद्या बाईचे उलटे पाय बघितले की आपली तंतरते, घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागले की आपण घाबरतो. म्हणजे उलट्या गोष्टी बऱ्याचदा अशुभ मानल्या जातात.

पण भारतात असंच एक गाव जिथं घड्याळाचे काटे उलटे फिरतात. हे गाव आहे छत्तीसगड मध्ये. आणि बरं का मंडळी फक्त घड्याळच नाही तर गावातल्या बऱ्याच गोष्टी बघून तुमचं डोकं हलल्याशिवाय राहणार नाही.

या गावातील प्रथेनुसार घड्याळाचे काटे विरुद्ध दिशेने फिरतात. एवढेच नाही तर रात्री 12 वाजल्यानंतर नॉर्मल घड्याळात 1 वाजतो. पण तिथं 11 वाजतात.

घड्याळ एंटी क्लॉकवाइज चालण्याची कारणं..

या गावातील घड्याळं नॉर्मल घड्याळांप्रमाणे डावीकडून उजवीकडे नाहीतर उजवीकडून डावीकडे धावतात. याचा अर्थ इथली घड्याळं एंटी क्लॉकवाइज चालतात. ही प्रथा पाळणारे गोंड आदिवासी समाजातील लोक सांगतात की त्यांची घड्याळं अचूक वेळ सांगतात.

या समाजाने घड्याळाला सुद्धा स्वतःचं नाव दिलंय. त्यांच्या घड्याळाला गोंडवाना टाइम म्हणून ओळखलं जातं. लोक म्हणतात की पृथ्वी उजवीकडून डावीकडे फिरते, याशिवाय चंद्र किंवा सूर्य किंवा तारे हे सर्व याच बाजूने फिरताना दिसतात.

म्हणून या समाजातील लोकांनी घड्याळाच्या काट्याची दिशा पृथ्वी फिरते त्याच दिशेत ठेवली आहे.

इथले लोक लग्नाच्या सप्तपदी सुद्धा उलट्या घेतात.

गोंड समाजातील लोकांच्या लग्नाच्या पद्धतही वेगळ्या आहेत. या समाजातील वधू-वर लग्नाच्या सप्तपदी उलट्या दिशेने घेतात.

या समाजातील लोक महुआ, पारसा या झाडांची पूजा करतात. छत्तीसगडच्या या भागात सुमारे 10 हजार कुटुंबाची वस्ती आहे. राहतात.