Whatsapp गुलाबी रंगाचे होणार? व्हायरल मेसेजला क्लिक करण्याआधी हे नक्की वाचा

Whatsapp वर आलेली लिंक तुम्ही ओपन तर केली नाही ना?
Whatsapp
Whatsapp

सध्याच्या काळात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. कोसोदूर असणाऱ्या व्यक्तीशी या अ‍ॅपच्या माध्यमातून सहज संपर्क साधता येतो. त्यामुळे हे अ‍ॅप जगभरात लोकप्रिय आहे. व्हॉट्स अॅपविषयी दररोज नवनवीन चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगत असतात. यामध्येच सध्या Whatsapp वर एक नवीन मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये Whatsapp चा रंग आता बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच एक लिंकदेखील देण्यात आली आहे. मात्र, ही लिंक ओपन करणं महागात पडणार आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपविषयी कोणतीही लिंक आली तर ती ओपन करु नका असा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर Whatsapp चा रंग बदलणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसार, मेसेजसोबत आलेली लिंक ओपन केल्यास Whatsapp रंग हिरव्यावरुन थेट गुलाबी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, हा फेक मेसेज असून Whatsappमध्ये असा कोणताही बदल होणार नसल्याचं सायबर तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

Whatsapp
एकाच घरातील दोन दरवाजे उघडतात वेगवेगळ्या राज्यात

व्हायरल मेसेजसोबत आलेली लिंक ओपन केल्यास तुमचा फोन हॅक होण्याची शक्यता आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजहरिया यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

दरम्यान, APK डाउनलोड लिंकसोबत Whatsapp ग्रुपमध्ये व्हायरल पसरविण्याचादेखील हा हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com