Weight Gain : 'या' ३ स्टेप फॉलो करा अन् वाढवा वजन

वजन वाढत नसेल तर फॉलो करा 'या' स्टेप
Weight
Weight Sakal

सध्याच्या काळात असंख्य जण वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. जंकफूड किंवा फास्टफूड जरासं जरी खाल्लं तरीदेखील अनेकांचं वजन झपाट्याने वाढतं. त्यामुळे सध्याच्या काळात वाढतं वजन ही अनेकांची समस्या आहे. परंतु, यामध्येच असेही काही जण पाहायला मिळतात जे कमी वजनामुळे समस्याने त्रस्त आहेत. हो. अनेकांची शरीरयष्टी ही मुळातच बारीक असते. त्यामुळे त्यांनी कितीही खाल्लं किंवा कितीही नवनवीन प्रयोग केले तरीदेखील त्यांचं वजन यत्किंचितही वाढत नाही. म्हणूनच, वजन कमी असणाऱ्यांसाठी काही खास टीप्स आम्ही देणार आहोत. या टीप्स दररोज फॉलो केल्या तर नक्कीच काही महिन्यात तुमचं वजन वाढेल. (weight gain 3 simple steps to gain weight)

१. डाएट -

डाएट हे वजन कमी करणाऱ्यांसाठीच असतं असा एक सर्वसामान्य गैरसमज आहे. परंतु, वजन वाढवायचं असेल तरीदेखील डाएट केलं जातं. त्यामुळे वजन वाढवणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट सुरु केलं पाहिजे. योग्य डाएट केल्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता भरुन निघते. तसंच मेटाबॉल्जिम वाढतो. ज्यामुळे अन्नपचन सुरळीत होतं. परिणामी वजन वाढू लागतं. तसंच आहारात दररोज शक्य होईल त्याप्रमाणे दूध, अंडी, चिकन, मासे यांचा समावेश करावा.

Weight
'ही' काळजी घेतली तर कधीच निघणार नाही नॉन स्टीक भांड्याचं कोटिंग

२. कॅलरी -

वजन वाढवायचं असेल तर भरपूर कॅलरीयुक्त पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. यासाठी आहारात प्रोटीन, व्हिटामिन, फॅट्स आणि कार्बोहाड्रेट पदार्थांचा समावेश करावा. शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी कॅलरीज अत्यंत महत्त्वाचं काम करत असतात. त्यामुळे नियमित योग्य पद्धतीचा आहार घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच शरीरात ऊर्जा निर्माण होऊ शकते.

३. वर्कआऊट -

वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठीच वर्कआऊट केला जातो, असाही एक गैरसमज सगळीकडे आहे. परंतु, ज्या लोकांना वजन वाढवायचं आहे तेदेखील जीमचा आधार घेऊ शकतात. वजन वाढवण्यासाठी अनेक एक्सरसाइज आहेत. ज्यामुळे वजन वाढू शकतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com