Weight Loss Tips : काय सांगताय? आता चहा पिऊन होईल वजन कमी? कसे जाणून घ्या l weight loss tips loose your weight by taking different tea pudina tea, lemon tea, green tea black tea | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss Tips

Weight Loss Tips : काय सांगताय? आता चहा पिऊन होईल वजन कमी? कसे जाणून घ्या

Weight Loss Tips : बऱ्याच लोकांना दिवसातून अनेकदा चहा प्यायला आवडते. डोकेदुखी असो किंवा कामाचा थकवा, तो दूर करण्यासाठी बरेच लोक चहा घेतात. मात्र चहाने अॅसिडीटी वाढते हेही तेवढेच खरे. पण चहाने वजनसुद्धा कमी करता येते हे तुम्हाला माहितीये काय? जाणून घ्या चहाबाबत काही खास गोष्टी

वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम प्रभावी चहा म्हणजे ग्रीन टी. रोज सकाळी नेहमीच्या चहाऐवजी ग्रीन टी घ्या. तुम्हाला काही दिवसांतच इफेक्ट दिसून येईल.

आल्याचा चहा - अनेक डॉक्टर सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी आल्याचा चहा पिण्याचा सल्ला देतात.या चहामुळे अपचनाचा त्रासही दूर होतो. आणि अन्न लवकर पचण्यास मदत होते. आल्याचा चहा पचनसंस्था व्यवस्थित ठेवून वजन लवकर कमी करण्यासाठी चांगले काम करते.

पुदिन्याचा चहा - पुदिन्याचा चहा वजन कमी करण्यासाठी तितकाच प्रभावी आहे. या चहामध्ये मेन्थॉलचा थंड प्रभाव असतो. बद्धकोष्ठतेपासून पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी पुदिन्याचा चहा खूप प्रभावी आहे. हा खास चहा पचवण्याची क्षमता वाढवत वजन कमी करण्यास प्रभावी ठरते.

जास्वंदाचा चहा : जास्वंदीच्या फुलांच्या अर्कापासूनसुद्धा खास चहा बनवता येतो. हा चहा नियमित प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. परिणामी रक्तदाब नियंत्रित राहतो. हे चरबी देखील कमी करते आणि लिव्हर निरोगी ठेवते. (Weight Loss)

शुगर फ्री ब्लॅक टी - तुम्हा मधुमेहाचा त्रास असेल किंवा अन्य काही त्रास असेल तर चिंता करु नका. साखर नसलेला काळा चहा तुम्हाला उत्कृष्ट परिणाम देईल. कितीही चरबी असली तरी, हा चहा जलद वजन कमी करण्यासाठी चांगला काम करतो.

चहाचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेसुद्धा आहे. तेव्हा तुम्हाला हवं तेवढ्या वेळा तुम्ही दिवसातून चहा पित असाल तर त्याचे दुष्परिणाम होतील. तेव्हा चहा पिण्याचीसुद्धा एक मर्यादा असावी. चहा प्यायल्याने तुमची अॅसिडीटी किंवा शरीरातील उष्णता वाढणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यावी.

वरील चहाचे प्रकार तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी पिल्यास तुम्हाला परिणाम जाणवेल.