Hybrid Datingम्हणजे काय? याचे फायदे-तोटे काय? जाणून घ्या

first date with lover
first date with loverSakal

कोरोना काळात आपल्या दैनदिन जीवनावर खूप मोठा परिणाम झाला आहे. २०२० मध्ये जेव्हा कोरोना संक्रमण वेगात वाढू लागले तेव्हा जगभरात सगळीकडे लॉकडाऊन लागू करण्यात आला. काही काळासाठी सार जगाचा वेग मंदावला होता. लो आपल्या आपल्या घरामध्ये कैद होते. एक दुसऱ्यांना संबध साधण्यासाठी कित्येक साधणे असूनही नाती तुटत चालली होती. नुकताच प्रेमात पडलेल्या जोडप्यांच्या रोमान्सवर पाणी पडले होते. आता लॉकडाऊन नाही पण कोरोना आपल्या आयुष्यातून अजूनही गेला नाही. अशावेळी आता कित्येक प्रकारच्या बंधने लादली आहे. त्यात रोमान्स करण्याचे नवीन नवीन पध्दती निर्माण केल्या जात आहे. हायब्रीड रोमान्स देखील असाच एक नवीन प्रकार आहे. ज्या प्रकारे आज कार्यलयामध्ये हायब्रिड पध्दतीने काम केले जाते. त्याप्रमाणे हायब्रिड डेटिंगचा नवीन ट्रेंड आला आहे.

first date with lover
किती डेटवर गेल्यानंतर लैंगिक संबध ठेवणे योग्य? टिव्ही प्रेजेंटरचे धक्कादायक उत्तर

काय आहे हायब्रीड डेटिंग?

हायब्रिड डेटिंगमध्ये ऑनलाईन चॅट आणि व्हिडिओ कॉल मार्फत रोमान्स केला जातो आणि प्रत्यक्षात भेटूनही एकमेकांसाठी प्रेम व्यक्त केले जाते. हे अगदी तसेच आहे जसे आजकाल ऑफिसचे काम केले जाते. लोक आठवड्यातील काही दिवस ऑफिसमध्ये जाऊन काम करतात आणि काही दिवस घरातून ऑनलाईन काम करतात. कोरोना काळात असे डेटिंग अॅप समोर आले आहेतत ज्यावर तरूण जोडपी आपल्या नव्या पध्दतीने वापरत आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर फिजिकल रोमान्स सोबत व्हर्च्युअल रोमान्स देखील होत असेल तर त्याला तुम्हा हायब्रीड रोमान्स किंवा डेटिंग म्हणू शकता. हायब्रिड डेटिंगचे काही फायदे - तोटे देखील आहेत.

हायब्रीड डेटिंगची गरज का?

कोरोना संक्रमणाचा काही नेम नाही . कधी संक्रमणाचा वेग वाढेल, कधी मंदावेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांच्या मनात ही भिती असते की, बाहेर पडल्यास कोरोना संक्रमण होऊ नये. याच कारणामुळे तरुण आपला काही वेळ आपल्या पार्टनरसोबत फिजकली देखील घालवू इच्छितात आणि बाकी वेळ ते ऑनलाईन रोमान्स करतात.

first date with lover
Male Infertility : पुरुष वंध्यत्व म्हणजे काय? काय आहेत लक्षणे, उपाय

हाइब्रिट डेटिंग करताना येणारे अडथळे?

कोरोना केव्हा संपेल हे कोणालाच माहित नाही. अशा वेळी नेहमी भिती वाटत राहके की बाहेर गेल्यास कोरोना संक्रमण होऊ नये. पण बहूतेक जोडपे ऑनलाईन चॅटवर रोमान्स करत राहतात. पण समस्या तेव्हा निर्माण होतो जेव्हा दोघांपैकी एकाला कोरोना होतो. तसेच असे नाते टिकवणे अवघड असते. कोरोनामुळे लोकांचा धीर सुटत चालला आहे. लोकांना बाहेर फिरायचे आहे. अशामध्ये जर रोज रोज आठवड्यातून दोन-तीन वेळा पार्टनरला भेटू शकले नाही तर त्रास होतो. त्यामुळे नाते खराब होऊ शकते.

हायब्रिड डेटिंगमध्ये तीच समस्या आहे जी ऑनलाईन डेटिंगमध्ये दिसते. प्रेमासाठी भावनिक देवाणघेवाण आवश्यक असते परंतु तुलनेने ते जास्त दिवस मिळणे शक्य नसते. नंतर हे मशीन डेटिंग वाटू लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com