Covid Prevention : WHO नी सांगितल्या मास्क घालण्याच्या चार पद्धती, हे वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Prevention

Covid Prevention : WHO नी सांगितल्या मास्क घालण्याच्या चार पद्धती, हे वाचाच

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना रुग्ण संख्या पून्हा वाढली आहे. जगभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने चिंतेचे वातावरण आहे. असं म्हणतात की येत्या तीन महिन्यांमध्ये तीन लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्व:ची विशेष काळजी घेण्याची आवाहन सर्व स्तरातून केले जात आहे.(WHO shared 4 mask related guidelines to prevent covid 19 or coronavirus )

WHO ने सुद्धा नियमावली जाहीर केली असून सावधगिरीचा इशारा दिलाय. सोबतच  मास्क लावण्यासंदर्भात काही नियम सांगितले आहे ज्यामुळे कोरोनापासून आपल्याला संरक्षण करता येईल.

व्हायरसच्या ट्रांसमिशनला कमी करण्यासाठी आणि मानवी जीवाला या धोक्यापासून वाचविण्यासाठी मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे. WHO ने असंही म्हटलंय की कोरोनाच्या विरोधात सुरक्षेसाठी फक्त मास्क लावणे गरजेचे नाही तर कोरोनासंबधित सर्व नियम पाळणेही तितकेच गरजेचे आहे.

हेही वाचा: Corona Updates : सावधान! कोरोना पुन्हा आलाय, अशी घ्या काळजी

कोरोनाच्या कोणत्याही व्हेरीएंटपासून दूर राहण्यासाठी आपण मास्क लावावे आणि सतर्क रहावे. उदा. सोशल डिस्टंस, साफसफाई करणे, गर्दीपासून दूर राहणे, हात साफ करणे आणि खोकला येताना रुमाल वापरणे, इत्यादी.

हेही वाचा: Corona Mental Health :कोरोनाच्या टेन्शनला द्या सुट्टी !

WHO ने मास्क घालण्याचे चार प्रकार सांगितले

  1. मास्क लावण्यापूर्वी किंवा मास्कला काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यावे.

  2. आपल्या नाक, तोंड ला कवर करत असेल, असे मास्क लावावे.

  3. मास्क काढतो तेव्हा एका स्वच्छ प्लास्टिक बॅगमध्ये स्टोर करावे आणि जर मास्क कपड्याचा असेल तर मास्क प्रत्येकदिवशी धुवावे सोबतच मेडिकल मास्कला कचऱ्यात टाकावे.

  4. वॉल्व मास्कचा कधीही वापर करू नये.