
Black Grapes : काळी द्राक्षं हिरव्या द्राक्षांपेक्षा महाग का असतात? जाणून घ्या खरं कारण
why Black Grapes is expensive : अनेक लोकांना द्राक्षे खायला आवडतात.बाजारात काळी द्राक्षांंची किंमत हिरव्या द्राक्षांपेक्षा जास्त असते. त्याची टेस्ट वेगवेगळी आहे. खरंच द्राक्षांच्या चवीनुसार द्राक्षे महाग आहे का? मग कोणत्या कारणाने काळी द्राक्षे महाग आहे? आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत. (Black Grapes Vs Green Grapes )
काळी द्राक्षे का असतात महाग?
असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे काळी द्राक्षे हिरव्या द्राक्षांच्या तुलनेत जास्त महाग असतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याची उत्पादन प्रक्रिया थोडी वेगळी असते. काळ्या द्राक्षांच्या उत्पादनासाठी एक खास वेदर कंडीशन आणि माती हवी असते.
तुम्ही खुप जास्त थंड आणि खुप जास्त गरम वातावरणात शेती करू शकत नाही. काळी द्राक्षांची खूप काळजी घ्यावी लागते. या द्राक्षांची अशा उत्पादना प्रक्रियेमुळे या द्राक्षांची प्राइस जास्त असते.
काळी द्राक्षांची डिमांड हिरव्या द्राक्षांच्या तुलनेत जास्त असते. मात्र याचा सप्लाय मागणी नुसार पुर्ण केला जात नाही ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या नियमांनुसार ग्राहकांच्या खिशावर ताण पडतो. याशिवाय काळी द्राक्षे हाताने तोडली जातात. जर हेच काम मशीनद्वारे केले तर याची किंमत थोडी कमी असती. याची पॅकींगही थोडी हटके असते.
आरोग्यासाठी काळी द्राक्षे फायदेशीर आहे
किंमत जास्त असल्याचे आणखी एक कारण म्हणजे काळी द्राक्षांमध्ये हेल्थ बेनेफिट्स जास्त असते. फळांमध्ये एंटीऑक्सिडेंटसह न्यूट्रिएंट्सची मात्राही अधिक असते. ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा मिळतो.
यात असलेले पोटॅशिअम ह्रदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते. सोबतच व्हिटामिन इ च्या मदतीमुळे स्किन आणि केसांचं सौंदर्यसुद्धा वाढतं. ज्यो लोकांना डोळ्यांनी दिसत नाही त्यांच्यासाठी काळी द्राक्षे फायदेशीर ठरतात.