
Vastu Tips : दुध सांडणं शुभ की अशुभ?
Vastu Tips : ज्योतिषशास्त्रानुसार दुध हे चंद्राचं कारक मानलं जातं. त्यामुळे दूध कधी सांडू नये किंवा उतू जाऊ नये, असे म्हटले जाते कारण दुध सांडणे, अशुभ मानले जाते. दुध सांडण्याचा अर्थ असा होतो की चंद्र तुमच्या कुंडलीत योग्य स्थितीत नाही. ( Spiritual Meaning Of Spilling Milk )
आज आपण दुध सांडण्यामागील कारण आणि दोष जाणून घेऊया ज्यामुळे आपल्याला दुध सांडणे शुभ की अशुभ हे जाणून घेता येईल. (Why is falling of the milk considered bad omen read story)
जर दररोज तुम्ही दुध उकळत असाल आणि ते उतू जात असेल तर तुमच्या घरात वास्तू दोष आहे, असे समजावे. यामुळे घरातील सदस्यांवर मानसिक परिणाम होतो. घरात नेहमीच तणावाचे वातावरण असते.
जर तुमच्या हातातून दुधाचं भांड पडलं आणि दुध सांडले किंवा पिताना दुधाचा ग्लास पडला, तर हे अशुभ संकेत असतात.
जेव्हा तुम्ही सकाळी दुध विकत घेताना कोणालाही बघता, हे शुभ असतं.
याशिवाय सकाळी सकाळी दुध विक्री करणारे दिसले तर हे शुभ संकेत असतात.
दुधाला धार्मिक कार्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दूध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दूधाचा अभिषेक हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे दुध हे एक पुजा वस्तू मानली जाते आणि याच कारणाने दुधाचे सांडणे अशुभ मानले जाते.