कार्ड न वापरता एटीएममधून काढता येतील पैसे; कसे ते पाहा...

क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढत असताना एटीएम कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून संरक्षण मिळणार आहे.
ATM
ATMgoogle

मुंबई : कोणत्याही कार्डशिवाय फक्त मोबाईल फोनद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून खातेदारांना आपल्या खात्यातून पैसे काढता येणार आहेत. एटीएममध्ये interoperable cardless withdrawalचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँका आणि एटीएम चालकांना दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेने म्हटलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, National Payments Corporation of India (NPCI)तर्फे Unified Payments Interface (UPI)ला सर्व बँका आणि एटीएम्सशी जोडले जाणार आहे.

ATM
दर महिन्याला २१० रुपये भरा आणि साठीनंतरची सोय करा

ही सुविधा कशी वापरावी ?

एटीएममध्ये कॅश विथड्रॉवलचा पर्याय निवडावा.

त्यानंतर UPI पर्याय निवडावा.

एटीएमच्या स्क्रीनवर क्यूआर कोड दिसेल.

मोबाईलवर यूपीआय अॅप उघडा.

त्यात क्यूआर कोड स्कॅन करा.

त्यानंतर एटीएमच्या स्क्रीनवर रक्कम लिहा. यात तुम्ही ५ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकता.

तुमचा यूपीआय पीन टाईप करून एन्टर करा.

क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढत असताना एटीएम कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून संरक्षण मिळणार आहे. सध्या कार्डच्या चिपचा तुटवडा असल्याने ग्राहकांना कार्ड देण्यास बँकांकडून उशीर होत आहे. अशावेळी कार्ड मिळाले नाही म्हणून थांबून राहण्याची गरज ग्राहकांना नाही.

ATM
दरवर्षी फक्त ३३० रुपये भरा; तुमच्या मृत्यूनंतर वारसाला मिळतील २ लाख रुपये

यूपीआय सुविधा कार्यान्वित झाल्यानंतरही कार्डचे महत्त्व कायम राहणार आहे; कारण कार्डचा वापर इतर अनेक कारणांसाठी केला जातो. क्यूआर कोडद्वारे पेमेंटही केले जाते. त्याशिवायही इतर कारणांसाठी कार्डचा वापर केला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव बँका त्यांच्या अॅपमध्येही क्यूआर कोड सुविधा देणार आहेत. यामुळे त्यांच्या डिजिटल व्यासपीठाचा वापर वाढेल. सध्या बहुतांशी क्यूआर कोडचे व्यवहार हे PhonePe, Google Pay, and Paytm यांद्वारे केले जातात.

पूर्वी ग्राहक आपल्याच बँकेच्या खात्यातून पैसे काढत तेव्हा एकाच बँकेच्या नेटवर्कमधून व्यवहार होत असे. पण आता यूपीआयचे नेटवर्कही वापरावे लागणार आहे. त्यामुळे बँकांचा एटीएम व्यवहारांवरील खर्च वाढणार आहे; मात्र ग्राहकांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com