Pedicure At Home : हजारो रुपये खर्च करायची गरज नाही, घरीच करा पार्लरसारखं पेडिक्युअर l women beauty tips do pedicure at home without wasting thousand rupees know easy method | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pedicure At Home

Pedicure At Home : हजारो रुपये खर्च करायची गरज नाही, घरीच करा पार्लरसारखं पेडिक्युअर

Pedicure At Home : गल्ली महिला त्यांच्या तळहाताच्या त्वचेपासून ते तळपायाच्या त्वचेपर्यंत अगदी नीट स्वत:ला जपतात. त्यासाठी पार्लरमध्ये भरपूर पैसेही खर्च करतात. मात्र मध्यवर्गीय महिलांना आता पार्लरमध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त उपाय घेऊन आलो आहोत. ज्याने तुम्हाला घरीच पेडिक्युअर करता येईल तेही फक्त दहा रुपयांत.

उन्हाळ्यात स्कीन जास्त टॅन होते तेव्हा तुम्हाला यंदा उन्हाळ्यात हा उपाय नक्कीच कामी पडेल. चला तर घरच्या घरी पेडिक्युअर कसे करायचे ते जाणून घेऊया.

घरच्या घरी पेडिक्युअर करण्यासाठी लागणारे साहित्य

  • एक खोलगट बादली

  • शाम्पू

  • सैंधव मीठ 

  • नेलपेंट रिमूव्हर 

  • नेल कटर 

  • लिंबू 

  • प्युमिक स्टोन 

  • गुलाबाच्या पाकळ्या 

  • फूट स्क्रब 

  • ऑलिव्ह ऑइल/ कोकोनट ऑइल/ बदाम ऑइल 

  • क्युटिकल क्रिम 

पेडिक्युअर कसं कराल 

  • यासाठी सर्वात आधी नखांवर नेलपेंट लावलेलं असेल तर ते रिमूव्हरच्या मदतीने काढून घ्या. नेल कटरच्या मदतीने सर्व नख व्यवस्थित हव्या त्या लेन्थवर कट करून घ्या. नेल फायलरने छान शेप द्या आणि नखांची टोकं शार्प करून घ्या.  नखांमध्ये काही घाण असेल तर काढून घ्या. 

  • आता दुसरीकडे , गरम पाण्याने भरलेली बादली किंवा टब घ्या. तुम्हाला झेपेल एवढं गरम पाणी तुम्ही घेऊ शकता.  त्यात लिंबाचा रस पिळा , गुलाबाच्या पाकळ्या, सैंधव मीठ, शाम्पूचे काही थेम्ब घाला आणि एकत्र करा. या बादलीत तुमचे दोन्ही पाय बुडवा. अगदी 20-25 मिनिट तसेच राहूद्या. त्यानंतर नेल ब्रशच्या साहाय्याने पाय आणि नख स्वच्छ करा. 

  • यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्या. नखांवर क्युटिकल क्रीम लावून घ्या. तुमच्याकडे क्युटिकल क्रीम नसेल तर ऑलिव्ह ऑईलसुद्धा वापरू शकता.  जिथे पायाची त्वचा जास्त कडक झालीये असं वाटत असेल तिथे प्युमिक स्टोनने घासा.असं केल्यास डेड स्किन निघून जाईल. 

  • आता नखांना लावलेलं क्रीम किंवा ऑइल पुसून घ्या. डेड स्किन म्हणजेच क्युटिकल्स जी नखांना चिकटलेली असते ती क्युटिकल च्या मदतीने काढून घ्या. आता चांगलं स्क्रब घ्या आणि त्याने पाय छान स्क्रब करून घ्या.

  • पायाचे तळवे, टाच आणि पायाची बोटं सगळीकडे स्क्रब व्यवस्थित घासून घ्या. यानंतर पाय स्वच्छ धुवून घ्या. यानंतर एक चमचा बदामाच्या तेलात ऑलिव्ह ऑइल घेऊन पायांना छान मॉलिश करा. मग तुमच्या नखांना आणि स्किन टोनला मॅच होईल असं एखादं नेलपेंट लावा. नको असल्यास नेलपेंट लावण्याची प्रोसेस स्किप करू शकता. (Skin Care)

अशा प्रकारे तुमचं घरच्या घरी पेडिक्युअरही होईल आणि पार्लरमध्ये पैसेसुद्धा खर्च होणार नाही.