Women Safety Tools : महिलांनो हे 5 सेफ्टी टूल्स कायम जवळ ठेवा, सुरक्षेसाठी बेस्ट अन् Easy To carry l women safety tools women should carry paper spray, safety pin, swis knife in hand bag | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Safety Tools

Women Safety Tools : महिलांनो हे 5 सेफ्टी टूल्स कायम जवळ ठेवा, सुरक्षेसाठी बेस्ट अन् Easy To carry

Women Safety Tools : महिला आज प्रत्येक क्षेत्रात जोमाने पुरुषांची बरोबरी करताय. तरी मात्र एकट्याने प्रवास करताना बहुतांश महिलांना त्यांच्या सुरक्षेची चिंता असते. विशेषत: संध्याकाळी किंवा रात्री महिलांसाठी एकट्याने प्रवास करणे सुरक्षित नाही. बरेच वेळा महिलांसंबंधिच्या काही धक्कादायक घटनांमुळे महिलांना रात्री एकट्याने प्रवास करण्याची धास्ती वाटायला लागते.

अशा परिस्थितीत महिलांनी काही सेफ्टी टूल्स कॅरी करणे फार महत्वाचे ठरते. जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करतीलच पण त्यांना घेऊन जाण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. घरातून बाहेर पडताना बहुतांश स्त्रिया त्यांच्या हँड बॅगमध्ये मेकअप प्रोडक्ट्स ठेवतात. अनेक महिला त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत महिला सुरक्षेच्या काही टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही एकट्यानेही तुमची सुरक्षितता सुनिश्चित करू शकता.

पेपर स्प्रे : महिलांना पेपर स्प्रे ठेवण्यासाठी बऱ्याचदा सांगितले जाते. तरी मात्र त्या या गोष्टींची टाळाटाळ करतात. पेपर स्प्रेची एक छोटी बाटली तुम्हाला मोठ्या संकटापासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या चिली स्प्रेच्या बाटल्या सहज उपलब्ध असतात.

कात्री : कार्यालयीन कामांसाठी किंवा इतर दैनंदिन कामांसाठी कात्रीचा वापर सामान्य आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या हँड बॅगमध्ये कात्रीही सोबत ठेवू शकता. सुरक्षेच्या वेळी मात्र ही कात्री तुमची ढाल बनून उपयोगी पडेल.

सेफ्टी पिन : महिलांच्या दैनंदिन दिनचर्येत सेफ्टी पिनचा वापर सर्रास केला जातो. सहसा महिला ड्रेस टक करण्यासाठी सेफ्टी पिनची मदत घेतात. परंतु सेफ्टी पिन हे तुमच्यासाठी सर्वोत्तम सुरक्षा साधन देखील सिद्ध होऊ शकते. हल्लेखोराला टोचून तुम्ही स्वतःचे रक्षण करू शकता. (Security)

नेलकटर किंवा स्विस नाइफ : सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी महिला त्यांच्या बॅगमध्ये नेलकटर किंवा चाकू ठेवू शकतात. विशेषत: स्विस नाइफ असणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ज्याच्या मदतीने तुम्ही हल्लेखोरावर ताबडतोब प्रत्युत्तर देऊ शकता.

चावी : एकट्याने प्रवास करताना चावीचा वापर करून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता. हल्लेखोराने हल्ला केल्यावर, आपण किल्लीच्या तीक्ष्ण भागाच्या मदतीने त्वरित प्रतिक्रिया देऊ शकता. म्हणूनच घरातून बाहेर पडताना हँड बॅगमध्ये एक मोठी टोकदार चावी ठेवा. (Women Safety)

महिलांनी कायम त्यांच्या सेफ्टीसहच घराच्या बाहेर पडायला हवं. या काही वस्तू तुमच्या जवळ असतील तर तुमच्या घरच्यांनाही आधार वाटेल. तुम्ही तुमचे संरक्षण स्वत: करू शकाल.