साडीवर मॅचिंगसाठी इवलासा लटकन खातोय भाव!

टीम ई-सकाळ
रविवार, 12 जानेवारी 2020

साडीवर मॅचिंग ब्लाऊज असो व इतर सोहळ्यामध्ये घालणाऱ्या लेहेंग्यावरील चोली आणि ओढणी. या सर्व कपड्यांना आकर्षक बनविण्यासाठी लटकनचा साज महत्त्वाचा ठरू लागला आहे

पुणे : "जरा त्या साडीवर मॅचिंग लटकन दाखवा.' "ओ दादा, यामध्ये छोटे लटकन नाही का? मला याच रंगाचे आणि याच आकाराचे लटकन द्या', अशा एक ना अनेक मागण्या तरुणी लटकन घेण्यासाठी करीत आहेत. बाजारात सध्या या इवल्याशा लटकनची मागणी भलतीच वाढली आहे. महिलांसाठी कोणतीही खरेदी करताना हा लटकन भलताच भाव खात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: indoor

लटकन वेधून घेतीय लक्ष!
साडीवर मॅचिंग ब्लाऊज असो व इतर सोहळ्यामध्ये घालणाऱ्या लेहेंग्यावरील चोली आणि ओढणी. या सर्व कपड्यांना आकर्षक बनविण्यासाठी लटकनचा साज महत्त्वाचा ठरू लागला आहे. त्यामुळेच साडी व ड्रेसचा लुक आकर्षक होत आहे. त्यामुळे लटकन खरेदी हे आकर्षणाचे केंद्र झाले आहे. लग्नापासून कॉलेज फेस्टपर्यंत सर्व सोहळ्यात महिला आणि मुली आपल्या लूकवर कटाक्षाने लक्ष ठेवतात. त्यासाठी कपड्यांपासून त्यावर लागणारे मॅचिंग ज्वेलरी व याचबरोबर जर त्या ब्लाऊज किंवा लेहेंगा-चोली घालणार असतील, तर त्याची तयारी सुरू होती ती याच लटकनच्या निवडीपासून. काही रुपयांपासून ते हजारोंच्या किमतीत (नेमक्या  किमती टाक) मिळणाऱ्या या लटकनची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, तो ऑनलाइन देखील विकला जात आहे.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बघा जरा, लटकनचे प्रकार! 
सध्या ऑनलाइन मिळणाऱ्या लटकनमध्ये रेशमी गोंडा, बीड व मल्टीकलर थ्रेड, थ्रेड झालार सारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत. बाजारपेठांमध्ये गोंड्याच आणि खड्यांचे तर याचबरोबर हाताने बनविलेल्या कॉटनचे, लोकरीचे व मोत्यांचे लटकनसुद्धा तितकेच आकर्षक आहेत. हे लटकन देशातील विविध भागांमधून मागविण्यात येतात. सुमारे 5 रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंत यांची किंमत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women saree matching latkan price in pune market

टॅग्स
टॉपिकस