पोट भरल्यानंतर महिला असतात जास्त रोमँटिक! संशोधनातून स्पष्ट | Relationship News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stomach was full

एका अभ्यासातून असे समोर आले आहे.

पोट भरल्यानंतर महिला असतात जास्त रोमँटिक! संशोधनातून स्पष्ट

एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, महिलांचे पोट भरलेले असताना त्या जास्त रोमँटिक (Romantic) असतात. याचा अर्थ असा की जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत (Partners)रोमान्सचा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्या.

हेही वाचा: पावसाळ्यात पार्टनरसोबत रोमँटिक क्षण घालवायचंय तर 'या' ठिकाणी जाऊन याच

एक्सप्रेस यूकेच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकन संशोधकांना एका अभ्यासात असे आढळून आले की, जेव्हा महिलांनी (Women) पोटभर जेवण केले तेव्हा त्यांच्यामध्ये रोमान्सची (Romance)भावना जास्त होती. संशोधनात सहभागी महिलांचे मेंदू स्कॅन (Brain scan)करून त्याच्या विविध प्रतिक्रियांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांना असे दिसले की, महिला जेवणापूर्वी जितक्या रोमँटिक नव्हत्या तितक्या त्या जेवणानंतर होत्या.

हेही वाचा: Malaika Arora | 'तू हसत रहा'; मलायकासाठी अर्जुनची रोमँटिक पोस्ट

त्यांनी सहभागी महिलांना एमआरआय स्कॅनर (MRI scanner)आणि त्यांचे रिपोर्ट पाहण्यापूर्वी आठ तास उपवास करण्यास सांगितले. उपवासानंतर त्यांच्यामध्ये जास्त रोमान्सची भावना नसल्याचे दिसून आले. त्यानंतर महिलांना चॉकलेट फ्लेवरचा 500 कॅलरीचा शेक देण्यात आला आणि पुन्हा त्यांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात आला. यावेळी महिलांनी रोमँटिक संकेतांना अधिक तीव्र प्रतिसाद दर्शविला.

जर्नल ऍपेटाइटमध्ये संशोधकांनी सांगितले की जेव्हा महिलांना भूक लागते तेव्हा त्यांचे लक्ष जेवणाकडेच असते. पण जेव्हा तिची गरज पूर्ण होते, तेव्हा त्यांचे लक्ष शारीरिक संबंधासारख्या इतर गरजांकडे वळवू शकते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RelationswomenPartnership
loading image
go to top