World Saree Day : महागड्या साड्यांची जपवणूक करताना 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

महागड्या साड्या जेवढ्या सुंदर दिसतात, तेवढीच त्यांची नीट काळजी घेणं गरजेच असतं. त्यासाठी काही टिप्स
World Saree Day 2022
World Saree Day 2022 esakal

World Saree Day 2022 : स्त्री सर्वात सुंदर साडीत दिसते. तिचं रुप खुलतं. मुलांना / पुरुषांना स्त्री साडीतच जास्त आवडते... असे अनेक वाक्य आपण ऐकतो आणि ते खरेही आहेत. महिलांचही साड्यांवर विशेष प्रेम असतं, अगदी रोज साडी नेसत नसल्या तरी.

सणसमारंभाला, पारंपरिक कार्यक्रमांना आवर्जून साडी नेसली जाते. आणि तेवढ्याच आवडीने खरेदी करतात. पण महागड्या साड्या जेवढ्या सुंदर दिसतात, तेवढीच त्यांची नीट काळजी घेणं गरजेच असतं. त्यासाठी काही टिप्स

साड्यांमध्ये सिल्क, खादी, कॉटन, बनारसी असे एक ना अनेक प्रकार बघायला मिळतात. जेवढी व्हरायटी तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारे त्याची काळजी घ्यावी लागते. विविध प्रकारच्या सिल्कच्या साड्यांची खरेदी करतात पण या साड्यांची काळजी आपण एखाद्या लहान बाळा प्रमाणे घेतली पाहीजे असे म्हटलं जातं.

हे ही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

World Saree Day 2022
World Saree Day 2022 esakal

साड्यांना बुरशी लागू नये म्हणून

सिल्कच्या साड्या दमट झाल्या तर त्यांचा रंग उतरण्याची शक्यता असते. या शिवाय या साड्यांना बुरशींचा प्रादूर्भाव होऊ शकतो. सिल्कची साडी थोड्याशी ओलसर राहिली तरी ती फाटू शकते. त्यामुळे साड्यांचे नुकसान होऊ शकते.

  • सिल्कची साडी कपाटात ठेवताना नेहमी सुती किंवा तलम कापडामध्ये ठेवा.

  • रंग उतरत असल्याने या साड्या इतर साड्यांसोबत ठेवू नका.

  • साडीचा बुरशी पासून बचाव करण्यासाठी अधून मधून साडील ऊन दाखवा.

  • साडीमध्ये ओलावा राहणार नाही आणि दमट वास येणार नाही.

World Saree Day 2022
World Saree Day 2022 esakal

साडी कशी धुवावी ?

सिल्क, खादी सारख्या साड्या घरी धुवूच नये पण जर तुम्ही साडी घरी धुणार असाल तर साडी थंड पाण्यामध्ये टाकून सौम्य साबणाने धुवावी. पण शक्यतो साड्या ड्रायक्लिन कराव्यात. यामुळे साड्यांचे आयुष्य वाढते आणि त्या दिर्घकाळ टिकतात.

World Saree Day 2022
World Saree Day 2022 esakal

साडी कपाटात कशी ठेवावी ?

  • साडी कपाटात ठेवतानासुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं असते.

  • साडी कपाटात हॅंगरवर लावून ठेवण्याऐवजी तिची नीट घडी घालून ठेवावी.

  • एखाद्या पांढऱ्या रंगाच्या सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवल्याने साड्या जास्त काळ टिकतात.

  • साडीची घडी काही काळाने उघडावी जर तुम्ही असे केले नाही तर साडी विरते.

  • साडीमध्ये बटर पेपर ठेवा

  • सिल्कची साडी इस्त्री करताना नेहमी उलट्या बाजूने करावी. म्हणजे तिची चमक कमी होणार नाही आणि त्यावरचं जरी काम कमी होणार नाही.

बनारसी साडीची काळजी कशी घ्यावी

सध्या लग्नाचा काळ सुरु आहे. लग्नासारख्या कार्यामध्ये महिला बनरसी साडीला प्राधान्य देताना दिसतात. पण या साडीची आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. नाहीतर काही काळाने या साड्या जुन्या वाटू लागतात. यासाठी बनरसी साड्या कपाटात ठेवताना वेगळ्या ठेवा इतर साड्यांमध्ये या साडीचा समावेश करु नका. या साडीला घरी धुण्याची चुक करु नका ही साडी ड्रायक्लिन करावी. इस्त्री करतानाही ही विशेष काळजी घ्या. ही साडी इस्त्री करताना साडी जळणार नाही याची काळजी घ्या.

World Saree Day 2022
World Saree Day 2022 esakal

सोनचाफ्याच्या फुलांचा वापर

  • साडीला बुरशी लागणे ही फार सामान्य गोष्ट आहे. त्यासाठी तुम्ही कडूलिंबाची पान सुकवून ती एखाद्या कापडात गुंडाळून साडीमध्ये ठेवू शकता.

  • वॉर्डरोबमध्ये सुकलेली सोनचाफ्याची फुलं,चंदनाचं लाकूड ठेवू शकता. यामुळे साड्यांना चांगला सुगंधसुद्धा येईल आणि साडी जास्त काळ टिकेल.

  • परफ्युमचा वापर करताना थेट साडीवर करू नये, नाहीतर परफ्युममधील केमिकल्समुळे टिश्यूच्या धाग्यांवर व्यस्त परिणाम होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com