
Toxic People : तुमच्या 'या' सवयी बनवताय तुम्हाला टॉक्सिक! आजच बदला नाहीतर...
Personality Development : काही लोक असेही असतात ज्यांच्यापासून आपण दूर राहणे पसंत करतो. अशा लोकांना टॉक्सिक स्वभावाचे देखील मानले जाते, पण तुम्हाला माहित आहे का अशा कोणत्या सवयी आहेत ज्यांमुळे तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांपासून दूर करतात?
अशा सवयी कोणत्या?
१. स्वतःला सर्वोत्तम समजणे
असे काही लोक असतात जे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. ते इतरांच्या समोर स्वतःला अधिक बुद्धिमान असल्याचे दाखवतात. अशा लोकांशी तुम्ही त्यांच्याच भल्याबद्दल बोललात तरी ते तुम्हाला मूर्ख समजतील. या कारणास्तव, असे लोक त्यांच्या जवळच्या लोकांपासून दूर जातात. तसेच लोकांना त्यांच्याशी कमी बोलणं आवडतं.
२. इतरांवर नियंत्रण ठेवणे
समोरच्या व्यक्तीच्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करणारे अनेक लोक असतात. असे लोक नेहमीच आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना फक्त असं वाटतं की समोरच्या व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत आपलं ऐकावं आणि जर त्यांनी असं केलं नाही तर त्यांच्या इगो दुखावल्याचा त्रासही होतो.
३. नकारात्मक टिप्पण्या
काही लोकांना अशी सवय असते की त्यांना एखादी चांगली गोष्ट दिसली तरीही त्यात ते काहीतरी नकारात्मक गोष्ट शोधून तशा प्रतिक्रिया देतात. समोरच्या व्यक्तीला अपमानित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे असे लोक स्वतः सर्वांच्या नजरेत पडतात.