तरुणाई जोमात; केसांच्या प्रेमात!

लांबसडक केस... हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंग या बरोबरच स्टेप कट, लेअर कट, फेदर कट यासह विविध प्रकारच्या हेअर स्टाइलसाठी मॉडर्न युगात प्रवेश करणाऱ्या सध्याच्या युवती दरमहा हजारो रुपये खर्च करू लागल्या आहेत.
Hair
HairSakal
Summary

लांबसडक केस... हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंग या बरोबरच स्टेप कट, लेअर कट, फेदर कट यासह विविध प्रकारच्या हेअर स्टाइलसाठी मॉडर्न युगात प्रवेश करणाऱ्या सध्याच्या युवती दरमहा हजारो रुपये खर्च करू लागल्या आहेत.

- अंजली काचळे

पुणे - लांबसडक केस... हेअर (Hair) स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंग या बरोबरच स्टेप कट, लेअर कट, फेदर कट यासह विविध प्रकारच्या हेअर स्टाइलसाठी (Hair Style) मॉडर्न युगात प्रवेश करणाऱ्या सध्याच्या युवती (Girls) दरमहा हजारो रुपये खर्च (Expenditure) करू लागल्या आहेत. त्यासाठी खास ‘नॅशनल ब्रॅण्ड’ची (National Brand) दालनेही शहरात सुरू झाली आहेत. तसेच केशसांभाराचे सौंदर्य वाढविण्यासाठी डॉक्टरांकडे उपचार (Doctor Treatment) घेणाऱ्या युवतींचीही संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

केशसांभार आकर्षक दिसण्यासाठी युवती सातत्याने प्रयत्नशील असतात. आजीबाईच्या बटव्यातील औषधांपासून मॉडर्न ट्रीटमेंटही त्या घेतात. त्यासाठी भरभक्कम रक्कमही खर्च करतात. शहरी किंवा ग्रामीण भाग असा काही फरक त्यात राहिला नसून मिळेल तेथे ट्रीटमेंट घेतली जाते. त्यासाठी वेगवेगळी उत्पादनांचीही (प्रॉडक्ट) बाजारात रेलचेल झाली आहे.

स्पर्धात्मक जगात व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्यासाठी युवती विविध प्रकारच्या उपाययोजना करतात. त्यात त्वचा, दंतारोग्य या बरोबरच हेअर स्टाइल हा देखील एक महत्त्वाचा घटक झाला आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील ब्रॅण्डची सलून शहरात वेगाने वाढत आहे. त्यांना पूरक हेअर स्पेशलिस्टचीही संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सलूनमध्ये एका वेळच्या हेअर वॉशसाठी ६०० ते १५०० रुपयेही युवती खर्च करू लागल्या आहेत.

शहरी भागातील महिलांना घर, जॉब या धावपळीच्या आयुष्यात केसांची निगा राखणे अवघड जाते. म्हणून केसांच्या आरोग्यासाठी उपचार घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यात केवळ ‘आयटी’मधील महिला किंवा युवती नाहीत, तर प्रशासन, खासगी नोकरी आणि उद्योग जगतामधील महिलांचाही समावेश आहे. केवळ हेअर ट्रीटमेंटसाठी दरमहा ३ ते ५ हजार रुपये खर्च करणाऱ्या महिला- युवतीही मोठ्या संख्येने आहेत. तसेच केसांचे आरोग्य राखण्यासाठी पूरक उत्पादने ऑनलाइन पद्धतीने खरेदी केली जात आहेत. तसेच सिस्टीन, हेअर प्रोटीनसारखे उपचार मोठ्या संख्येने घेतले जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

Hair
Top Trend 2022 : फॉक्स लेदरच्या फॅशनचा बोलबाला

माझे केस खूप मोठे आहेत. पण ऑफिस आणि घर या धावपळीच्या आयुष्यात मला त्याची योग्य निगा राखणे अवघड जाते. त्यामुळे मी महिन्यातून एकदा हेअर स्पा करते. त्यामुळे केसांची योग्य ती काळजी घेतली जाते.

- अक्षदा डोंगरे, बाणेर

युवती व महिलांमध्ये त्वचेबरोबरच केसांच्या आरोग्याबद्दलची जागरूकता सध्या वाढत आहे. पूर्वी काही समस्या उद्‌भवली तरच केसांसाठी उपचार घेतले जात. परंतु, आता जागरूकता वाढल्यामुळे आणि आकर्षक दिसण्यासाठीदेखील केसांवर उपचार घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

- डॉ. पल्लवी अहिरे-शेळके, त्वचा व केशरोग तज्ज्ञ

केसांच्या आरोग्यासाठी घ्या ही काळजी...

आहारात प्रथिनेयुक्त व लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा

केसांसाठी सौम्य शाम्पूचा वापर करावा

वारंवार प्रॉडक्टमध्ये बदल करू नका

उन्हात किंवा हवेत जाताना स्कार्पचा वापर करावा

कंडिशनर नेहमी केसांच्या टोकाशी लावावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com