'आप' उमेदवार आतिशी यांच्या विरोधात गंभीर यांनी वाटले अपमानास्पद पॅम्प्लेट?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

  • सोशल मिडीयावर आतिशी यांना नेटकऱ्यांचा पाठींबा 
  • 'आप'ने पत्रकार परिषदेतून व्यक्त केला रोष
  • आतिशींचे गंभीर यांना प्रश्न

लोकसभा 2019
नवी दिल्ली : दिल्लीत एक पॅम्प्लेट पसरवण्यावरुन मोठा वाद उद्भवला आहे. ज्यात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या उमेदवार आतिशी यांचा अपशब्द वापरून अपमान केला आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली. 

या पत्रकार परिषदेत पक्षातर्फे भाजप उमेदवार गौतम गंभीर यांनी हे पॅम्प्लेट त्यांच्या समर्थकांना सर्वत्र वाटायला सांगितले असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हे पॅम्प्लेट वाचतानाही लाज वाटत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'गौतम गंभीर हे देशासाठा खेळतात तेव्हा चौकार, षटकार मारतात, तेव्हा आपण टाळ्या वाजवतो. पण आम्ही हे स्वप्नातही विचार केला नव्हता की कुणी निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून इतक्या खालच्या स्तरावर जाऊ शकतं.' 
 

आतिशी यावेळी म्हणाल्या, 'माझा गंभीर यांना केवळ एकच प्रश्न आहे की जर ते माझ्यासारख्या एका सशक्त महिलेला हरविण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात, तर खासदार बनल्यानंतर ते आपल्या मतदारसंघातील महिलांना कसे सुरक्षित करतील?' 

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'कधी कल्पनाही केली नव्हती की गौतम गंभीर या पातळी सोडतील. जर लोक अशी मानसिकता असलेल्यांना मत देणार असतील तर महिला कशा सुरक्षिततेची अपेक्षा करु शकतात. आतिशी, तुम्ही मजबूत रहा. मी कल्पना करु शकतो की ही वेळ तुमच्यासाठी किती कठीण आहे. अशाच ताकदींविरुद्ध आपल्याला लढायचे आहे.'

'आप' उमेदवार आतिशी यांच्या विरोधात पसरविण्यात आलेले पॅम्प्लेट -

Atishi_AAP


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aam Aadmi Party accuses bjp candidate gautam gambhir for circulating derogatory pamphlet about Atishi