Loksabha 2019: अब न्याय होगा; काँग्रेसचे प्रचारगीत प्रदर्शित (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
रविवार, 7 एप्रिल 2019

- काँग्रेसकडून नवीन गाणे प्रसिद्ध
- ‘अब होगा न्याय’ हे गाणे प्रसिद्ध
- गाण्याची सुरवात 'मैं ही हिंदुस्तान हूँ' या शब्दांनी

नवी दिल्ली: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपले नवीन गाणे प्रसिद्ध केले आहे. ‘अब होगा न्याय’ हे गाणे प्रसिद्ध करताना पक्षाने देशात ‘अन्यायाचे वातावरण’ असल्याचे म्हटले आहे. या गाण्याची सुरवात 'मैं ही हिंदुस्तान हूँ' या शब्दांनी होते तर शेवट 'अब होगा न्याय' या शब्दांनी करण्यात आला आहे.

काँग्रेसने या प्रचार गाण्यात शेतकरी, गरीब आणि युवकांचा उल्लेख केला आहे. तसेच शेतकरी समस्या, बेरोजगारीचे प्रमाण, नोटाबंदी, महिला सुरक्षा, जीएसटी आणि इतर बाबींकडे या गाण्यातून लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर देशातील सर्वच क्षेत्रातील लोक दाखवण्याचा प्रयत्न या गाण्यात केला आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने गाण्यातील काही ओळींवर आक्षेप नोंदवल्यानंतर प्रचार गाण्यात काँग्रेसने बदल केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास देशातील सर्वांत गरीब पाच कोटी कुटुंबीयांना वार्षिक ७२ हजार रुपये देणार असल्याचे काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे. या योजनेला त्यांना न्याय असे नाव दिले आहे.

Web Title: Ab Hoga Nyay Congress Launches Lok Sabha Campaign With Song