Congress Manifesto: 'मोदी सरकारच्या काळात 4.70 कोटी नोकऱ्या गेल्या'

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 एप्रिल 2019

- मोदी सरकारच्या काळात 4.70 कोटी नोकऱ्या गेल्या
- बेरोजगारीच्या मुद्यांवर काम करणार
- तरूण, महिला, शेतकरी तसेच छोटे उद्योजक यांना प्राधान्य
- मुंबईतल्या महिलांना महागाईपेक्षा सुरक्षेची जास्त चिंता 

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या काळात 4.70 कोटी नोकऱ्या गेल्या असल्याचा आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज (ता. 02) केला. आज काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुका समोर ठेऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी मनमोहन सिंग बोलत होते.

डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, काँग्रेस प्रामुख्याने बेरोजगारीच्या मुद्यांवर काम करणार असून जाहीरनाम्यात तरूण, महिला, शेतकरी तसेच छोटे उद्योजक यांना प्राधान्य दिले असल्याची मनमोहन सिंग यांनी ग्वाही दिली. यावेळी पुढे ते म्हणाले की, मुंबईतल्या महिलांना महागाईपेक्षा सुरक्षेची जास्त चिंता असल्याचे त्यांनी म्हटले. सोबतच, यावर काँग्रेस काम करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

121 ठिकाणी भेटी देऊन काँग्रेसने हा जाहीरनामा तयार केला असल्याची माहिती यावेळी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली आहे. जाहीरनाम्यात शेतकरी आणि नोकरदारांना प्राधान्य दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. जाहीरनाम्यात देशातील प्रत्येक घटकाचा विचार करण्यात आला असून देशासमोर बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे मत पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.

Web Title: Almost 5 crore people lost their jobs in Narendra Modi tenure sayas Manmohan Singh