Loksabha 2019: 'मोदी पुन्हा सत्तेत आले तर त्यासाठी राहुल गांधीच जबाबदार'

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची पुन्हा सत्ता आली तर यासाठी पूर्णपणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असतील असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची पुन्हा सत्ता आली तर यासाठी पूर्णपणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असतील असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी ट्विटरवर म्हटले होते की, आम्ही आम आदमी पक्षाला दिल्लीतील लोकसभेच्या 4 जागा सोडण्यासाठी तयार आहोत. पण, अरविंद केजरीवाल यांना हे मान्य नाही. या ट्विटवर टीका करताना केजरीवाल यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने आमच्यासोबत कधी बोलणे केले? आपने निवडणुकांचा जाहीरनामा जाहीर केल्यावर काँग्रेसने आमच्यासोबत बोलणी झाली असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांनी सांगितले की, काँग्रेस सोबत नसली तरी मोदी-शहाच्या जोडीला रोखण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर, वेळ पडल्यास लोकसभा निकालानंतर कोणत्याही मोदी शहांच्या विरोधात कोणत्याही आघाडीला समर्थन द्यायची वेळ आल्यास ते द्यायची आमची तयारी असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले आहे.

Web Title: Arvind Kejriwal jabs Rahul Gandhi for failed alliance talks