Election Results : उत्तर प्रदेशात भाजप आघाडीवर, राहूल गांधी पिछाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

उत्तर प्रदेशात भाजप 56 जागांवर आघाडीवर असून, अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पिछाडीवर आहेत. सप-बसप-रालोद गठबंधन एकवीस जागांवर आघाडीवर आहे. 

पुणे - उत्तर प्रदेशात भाजप 56 जागांवर आघाडीवर असून, अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पिछाडीवर आहेत. सप-बसप-रालोद गठबंधन एकवीस जागांवर आघाडीवर आहे. 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमध्ये चार हजार 881 मतांनी आघाडीवर आहेत. रायबरेलीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी 27 हजार मतांनी पुढे आहेत. भाजपचे गृहमंत्री राजनाथसिंह लखनौत 85 हजार मतांनी, चित्रपट अभिनेता रवीकिशन 85 हजार मतांनी, अभिनेत्री हेमामालिनी 63 हजार मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आघाडीवर आहेत. 

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव 13 हजार मतांनी, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव 32 हजार मतांनी, त्यांची पत्नी डिंपल यादव चार हजार मतांनी आघाडीवर आहेत. रामपूर मतदारसंघात सपचे आझमखान भाजपच्या अभिनेत्री जयाप्रदा यांच्यापेक्षा 29 हजार मतांनी पुढे आहेत. 

बसप 12 मतदारसंघात, सप आठ मतदारसंघात, अपना दल दोन मतदारसंघात, तर कॉंग्रेस एका मतदारसंघात आघाडीवर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP lead in Uttar Pradesh