LokSabha 2019 : भाजपचा बंडखोर नेता काँग्रेसच्या वाटेवर 

shatrughan-sinha
shatrughan-sinha

पाटणासाहीब : भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेले बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा 28 मार्च ला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसचा 'हात' हातात घेतील. राज्यसभेचे सदस्य आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष अखिलेशप्रसाद सिंह यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर सिन्हा यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरवात केली आहे. याआधी त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचीही भेट घेतली होती. त्यांनी ट्‌विटच्या माध्यमातून भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले होते. पाटणासाहीब मधून आता केंद्रीय मंत्री रविशंकरप्रसाद यांच्या विरोधात सिन्हा अशी 'कांटे की टक्कर' पहायला मिळणार आहे. भाजपने मात्र कोणत्याही परिस्थितीत रविशंकरप्रसाद यांनाच विजयी करण्याचे नियोजन आखले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com