Loksabha 2019 : भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार 

वृत्तसंस्था
शनिवार, 16 मार्च 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा उत्तर प्रदेशातील 71 खासदारांपैकी अनेकांना बदलण्याच्या मनःस्थितीत असून, महाराष्ट्रात मात्र नगर, सोलापूर, ईशान्य मुंबईसारख्या निवडक जागा वगळता, आहे त्याच खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची दाट चिन्हे आहेत.

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची (सीईसी) महत्त्वाची पहिली बैठक उद्या (ता. 16) दिल्लीत होत आहे.

या बैठकीनंतर रात्री उशिरा लोकसभेची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश व बिहारसह महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जाहीर होतील. याशिवाय वाराणसी, नागपूर, चंद्रपूर व मिर्झापूरसारख्या ज्या जागांवरील भाजप उमेदवार निश्‍चित आहेत, त्यांचीही घोषणा उद्याच होण्याची चिन्हे आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा उत्तर प्रदेशातील 71 खासदारांपैकी अनेकांना बदलण्याच्या मनःस्थितीत असून, महाराष्ट्रात मात्र नगर, सोलापूर, ईशान्य मुंबईसारख्या निवडक जागा वगळता, आहे त्याच खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची दाट चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मुख्य उपस्थितीत होणाऱ्या उद्याच्या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महिला आघाडीच्या विजया रहाटकर यांच्यासह संसदीय मंडळ व "सीईसी'चे अन्य सदस्यही हजर राहतील. 

Web Title: BJP Likely To Release First List Of Lok Sabha Candidates