Loksabha 2019: सध्या देशात कोणत्या पक्षाचे किती खासदार

वृत्तसंस्था
रविवार, 10 मार्च 2019

लोकसभेतील एकूण पक्षीय बलाबल, कुणाकडे किती खासदार होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. कारण आगामी लोकसभा निवडणुकांनंतर हे पक्षीय बलाबल बदलेल आसेल.

मुंबई : लोकसभेसाठी आज (ता.10) निनडणुक आयोग निवडणुकीची घोषणा करू शकते. 16 व्या लोकसभेत एकूण जागांच्या (545) दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा नसल्यामुळे कोणत्याही पक्षाला विरोधीपक्षाचं स्थान मिळू शकलेलं नाही. काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 44 जागा आल्या होत्या, तर तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्ष 37 जागांसह तिसऱ्या स्थानावर होता.

या धर्तीवर लोकसभेतील एकूण पक्षीय बलाबल, कुणाकडे किती खासदार होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. कारण आगामी लोकसभा निवडणुकांनंतर हे पक्षीय बलाबल बदलेल आसेल.

देशभरातील पक्षानुसार जागा
भाजप - 267
काँग्रेस - 44
अण्णाद्रमुक - 37
तृणमूल काँग्रेस - 34
बिजू जनता दल - 18
शिवसेना - 18
तेलुगू देसम पक्ष - 15
तेलंगणा राष्ट्रीय समिती - 10
माकप - 9
समाजवादी पक्ष - 7
लोक जनशक्ती पक्ष - 6
राष्ट्रवादी - 6
राष्ट्रीय जनता दल - 4
आप - 4
वायएसआर काँग्रेस - 4
शिरोमणी अकाली दल - 4
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट - 3
अपक्ष - 3
राष्ट्रीय लोक समता पक्ष - 3
अपना दल - 2
इंडियन नॅशनल लोक दल - 2
इंडियन युनियन मुस्लिम लीग - 2
जनता दल (सेक्युलर) - 2
जनता दल (युनायटेड) - 2
झारखंड मुक्ती मोर्चा - 2
जम्मू काश्मिर पीडीपी - 1
एनडीपीपी - 1
पट्टाई मक्कल काट्ची - 1
राष्ट्रीय लोक दल - 1
रेवोल्युशनरी सोशलिस्ट पार्टी - 1
सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट - 1
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
एमआयएम - 1
एनआर काँग्रेस - 1
भाकप - 1
जम्मू काश्मिर नॅशनल कॉन्फरन्स - 1
नामांकनप्राप्त अँग्लो इंडियन (भाजप) - 2
रिक्त - 24

आता महाराष्ट्रातील पक्षीय बलाबल पहायचे झाल्यास महाराष्ट्रात एकूण (48)  जागा आहेत यामधील भाजपकडे 22, शिवसेना 18 राष्ट्रवादी - 05, काँग्रेस - 02 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एका जागेवर खासदार आहे

Web Title: Constituency and Party wise Current MP list