LokSabha2019 : भाजपकडून पुन्हा 'फिर एक बार, मोदी सरकार'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

नवी दिल्ली : देशातील 2014 ची लोकसभा निवडणूक गाजली ती भाजपच्या विविध जाहिराती आणि घोषणांमुळे. काँग्रेसच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाला वैतगलेल्या लोकांसाठी 'अब की बार मोदी सरकार' ही त्यातीलच एक कॅची घोषणा होती. आता या निवडणूकीत त्याच्यात थोडा बदल करून 'फिर एक बार मोदी सरकार' अस म्हणत पुन्हा एकदा मोदींना सत्तेवर घेऊन येण्याचे आवाहन यातून करण्यात आले आहे. या घोषणेला घेऊनच 'फिर एक बार मोदी सरकार...' हे निवडणूकीचे 'थिम सॉंगही' बनविण्यात आले आहे.

काही दिवसांपासून मोदी आणि भाजपच्या नेत्यांकडून 'मै भी चौकीदार...' या घोषणेचा वापर प्रचारांसाठी केला जात आहे. सर्व प्रकारच्या सोशल मडियावर ही या घोषणेचा वापर मोठ्या खूबीने भाजपकडून सुरु आहे. त्याला आता या ही घोषणा आणि गाण्याची जोड मिळाली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते ही टॅगलाईन आणि थीम साँग नवी दिल्ली येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाने देखील आजच त्यांचे निवडणूकीतील थिम साँग प्रसिद्ध केले आहे. काँग्रेसनं न्याय योजनेवर लक्ष केंद्रीत करणारी 'अब होगा न्याय' अशी घोषणा दिली आहे. त्याच्यानंतर 'फिर एक बार, मोदी सरकार' ही आमची घोषणा असेल. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढाई आणि सामाजिक योजना असे अनेक मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले असल्याचे जेटली म्हणाले.

Web Title: Fir Ek Baar Modi Sarkar song release by BJP for Election Campaign