Loksabha 2019 : हार्दिक पटेल सर्वोच्च न्यायालयात

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

हार्दिक पटेल यांनी 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जामनगर मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्याचा निर्णय घेतला होता. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे. गुजरातमध्ये 26 लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी विसपूर दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अर्थात, त्यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी होणार नाही.

हार्दिक पटेल यांनी 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जामनगर मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्याचा निर्णय घेतला होता. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे. गुजरातमध्ये 26 लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. मेहसाना जिल्ह्यातील विसनगर न्यायालयाने पाटीदार आंदोलनादरम्यान 2015 मध्ये विसनगरमधील दंगल आणि हिंसाचारप्रकरणी पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात शिक्षा रद्दबातल करण्याची मागणी करणारी पटेल यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे पटेल निवडणूक लढण्यास अपात्र ठरले. न्यायालयाच्या निर्णयाने पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्या निवडणूक लढण्याच्या तयारीला धक्का बसला.

Web Title: Hardik Patel moves SC for stay on conviction as Lok Sabha poll deadline looms