Loksabha 2019: भाजपचा पराभव होणार हे निश्‍चित : प्रियांका 

वृत्तसंस्था
रविवार, 12 मे 2019

संतप्त नागरिकांनी सरकारवरील आपला राग मतदानातून व्यक्त केला असल्याने या निवडणुकीनंतर भाजपचा पराभव होणार, हे निश्‍चित आहे, असा दावा कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (ता.12) केला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

नवी दिल्ली: संतप्त नागरिकांनी सरकारवरील आपला राग मतदानातून व्यक्त केला असल्याने या निवडणुकीनंतर भाजपचा पराभव होणार, हे निश्‍चित आहे, असा दावा कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (ता.12) केला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

"जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड संताप आहे. मोदी हे कधीही जनतेच्या समस्यांबाबत बोलत नाहीत, ते वेगळ्याच घटनांबाबत चर्चा करतात. कॉंग्रेसने उपस्थित केलेल्या एकाही प्रश्‍नाला मोदींनी उत्तर दिलेले नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे थेट चर्चेचे आव्हानही त्यांनी स्वीकारलेले नाही. त्यामुळे जनतेने आपला राग मतदानाद्वारे व्यक्त केला आहे. केंद्रातून भाजपचे सरकार निश्‍चितपणे जाणार आहे,' असा दावा प्रियांका यांनी केला.

नेहरू-गांधी कुटुंबीयांवर भाजपकडून सातत्याने टीका होत असल्याबद्दल प्रियांका यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, माझ्या गुरूंनी मला संकटातही शांत राहण्यास शिकविले असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is clear BJP govt is going says Priyanka Gandhi after casting vote