Loksabha 2019 : काँग्रेसच्या नेत्याचा नागीण डान्स झाला व्हायरल

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 एप्रिल 2019

नागराज यांनी अचानक 1954 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नागीण चित्रपटातील गाण्यावर नृत्य करण्यास सुरुवात केली. आपल्या नेत्याला नाचताना पाहून समर्थकही त्यांच्याबरोबर नागीण डान्स करु लागले.

बंगळूरूः कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार आणि गृहनिर्माण खात्याचे मंत्री एमटीबी नागराज यांनी एका प्रचारसभेदरम्यान 'नागीण' चित्रपटातील गाण्यावर नृत्य सादर केले. संबंधित नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागराज हे चर्चेत आले आहे.

नागराज हे आपल्या समर्थकांबरोबर कटीगन्नाली गावामध्ये प्रचारासाठी गेले होते. काँग्रेसचे उमेदवार विरप्पा मोहली यांना मतदान करा, असे गावकाऱ्यांना सांगण्यासाठी नागराज चिक्काबल्लापूरा मतदारसंघातील या गावात आले होते. त्यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नागराज यांनी अचानक 1954 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नागीण चित्रपटातील गाण्यावर नृत्य करण्यास सुरुवात केली. आपल्या नेत्याला नाचताना पाहून समर्थकही त्यांच्याबरोबर नागीण डान्स करु लागले. नागराज यांचा हा नागीण डान्स जवळजवळ 10 मिनिटे चालला. नाचायला लागल्यानंतर नागराज यांचा उत्साह वाढला. ते अंगात आल्यासारखं गोलगोल फिरून नाचू लागले त्यावेळी अनेकांनी त्यांना सावकाश नाचा असाही सल्ला दिला. काही समर्थकांनी त्यांचे नृत्य कॅमेऱयामध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केले.

दरम्यान, प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते विविध प्रकारचे फंडे वापरताना दिसत आहेत. सोशल मीडियामुळे हे फंड व्हायरल होत असून, नेटिझन्स यावर व्यक्त होताना दिसतात.

Web Title: Karnataka minister MTB Nagaraj performs Nagin dance viral