Loksabha 2019: तिकीट कापल्यानंतर अडवानी, जोशी येथूनही बाहेर

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 मार्च 2019

- लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कट केला
- सप-बसपच्या महाआघाडीचे उत्तर प्रदेशात भाजपसमोर कडवे आव्हान
- उत्तर प्रदेशात यश मिळवण्यासाठी भाजपचे सर्वस्व पणाला

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकासाठी उमेदवारांची घोषणा करताना भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कट केला होता. सप-बसपच्या महाआघाडीने उत्तर प्रदेशात भाजपसमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात यश मिळवण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज आपल्या उत्तर प्रदेशातील स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा समावेश आहे. परंतु पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांना मोठा धक्का देत या यादीतून त्यांना वगळण्यात आले आहे. 

सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशसाठी भाजपाने एकूण 40 स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 80 जागा असून, 2014 च्या निवडणुकीत भाजपाने तिथे बंपर यश मिळवताना 70 हून अधिक जागांवर कब्जा केला होता. मात्र यावेळी सप-बसपने निवडणूकपूर्व आघाडी केल्याने भाजपसमोर आव्हान निर्माण झालेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LK Advani MM Joshi find no place in BJPs list of star campaigners