Loksabha 2019 : 'मोदीजी, तुम्ही गांजा ओढून बोलता का?'

Aap Leader Sanjay Singh
Aap Leader Sanjay Singh

नवी दिल्ली: मोदीजींची चौकशी करायला हवी, ते गांजा ओढत तर नाही ना? एखादी सडकछाप व्यक्तीच राजकीय पक्षांसाठी शराब, हेरोईन आणि कोकेन असे शब्द वापरू शकते, असे आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना 'सराब' संबोधल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या वादात आता 'आप'चे नेते संजय सिंह यांनी उडी घेतली आहे. संजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मोदीजींची चौकशी करायला हवी, ते गांजा ओढत तर नाही ना? एखादी सडकछाप व्यक्तीच राजकीय पक्षांसाठी शराब, हेरोईन आणि कोकेन असे शब्द वापरू शकते.' त्यांच्या या ट्विटमुळे भाजप आणि आपमध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे.

संजय सिंह यांनी एका जाहीर सभेतही मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदींनी तुम्हाला फसवले. ते इतके खोटं बोलले की तुम्ही त्यांच्या जाळ्यात सापडला आहात. या सगळ्यानंतरही मोदी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करतात. हे पाहून मला 'शोले' हा हिंदी चित्रपट आठवतो. यामध्ये अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांच्यासाठी बसंतीला मागणी घालायला तिच्या मावशीकडे जातात. त्यावेळी अमिताभ बच्चन म्हणतात की, 'धर्मेंद्र व्यसनी आणि जुगारी आहे, पण तुम्ही हे लग्न पक्के करा. मोदीजी हेदेखील धर्मेंद्र आहेत. देशात महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत, सुरक्षाव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र, या सगळ्यानंतरही मोदी भाजपला मतदान करा, असे आवाहन करतायत. त्यामुळे यावेळी त्यांच्यापासून सावध राहा.'

दरम्यान, मोदी यांनी गुरुवारी मेरठ येथे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी मोदींनी विरोधकांचा समाचार घेताना समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल आणि बहुजन समाज पक्ष यांच्या आद्याक्षरांचा वापर करत हे पक्ष उत्तर प्रदेशसाठी ‘सराब’ असल्याचे म्हटले. ही 'सराब' उत्तर प्रदेशसाठीच नव्हे, तर देशासाठीही घातकच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com