Loksabha 2019 : घराणेशाहीत काँग्रेसपेक्षा भाजप वरचढ...

Rahul Gandhi-Narendra Modi
Rahul Gandhi-Narendra Modi

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नाराज उमेदवारांची पळापळ सुरू असल्याचे पहायला मिळते. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना अनेक नेते घराणेशाहीचे उदाहरण देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात. मात्र, घराणेशाहीमध्ये काँग्रेसपेक्षा भारतीय जनता पक्ष वरचढ असल्याचे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे.

भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, पक्षात घराणेशाहीला स्थान नाही, असा दावा मोदी करतात. लोकसभा निवडणुकांच्या वेळी जे उमेदवार भाजपने दिले आहेत त्यात घराणेशाही हा मुद्दा धरला तर भाजपने काँग्रेसला मागे टाकले आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 38 टक्के उमेदवार हे घराणेशाहीतले आहेत. काँग्रेसमध्ये हे प्रमाण 26 टक्के आहे. शिवसेनेत हे प्रमाण 30 टक्के आहे, राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक म्हणजेच 59 टक्के इतका आहे. पण, काँग्रेसवर सातत्याने टीका केली जाते त्या काँग्रेसपेक्षा भाजपची घराणेशाही जास्त आहे, हेच आकडेवारीवरून दिसून येते.

घराणेशाहीची यादी पुढीलप्रमाणेः
भाजपच्या 23 उमेदवारांपैकी 9 उमेदवार हे घराणेशाहीतले..

  1. हिना गावित, लोकसभा मतदार संघ-नंदुरबार, हिना गावित या महाराष्ट्राचे माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत
  2. सुभाष भामरे, लोकसभा मतदारसंघ- धुळे, माजी आमदार गोजराताई भामरे यांचा मुलगा
  3. रक्षा खडसे, लोकसभा मतदारसंघ-रावेर, माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कन्या
  4. भारती पवार, लोकसभा मतदारसंघ-दिंडोरी, माजी आमदार ए. टी. पवार यांच्या कन्या
  5. पूनम महाजन, लोकसभा मतदारसंघ- मुंबई उत्तर मध्य, भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या
  6. कांचन कुल, लोकसभा मतदारसंघ-बारामती, रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी
  7. सुजय विखे पाटील, लोकसभा मतदारसंघ-अहमदनगर, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा
  8. प्रीतम मुंडे, लोकसभा मतदारसंघ-बीड, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या
  9. रणजीतसिंह निंबाळकर लोकसभा मतदारसंघ - माढा (अद्याप घोषणा बाकी)- माजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांचा मुलगा

काँग्रेसची यादी पुढीलप्रमाणे:

  1. कुणाल रोहिदास पाटील, लोकसभा मतदारसंघ-धुळे, माजी आमदार रोहिदास पाटील यांचा मुलगा
  2. चारूलता टोकस, लोकसभा मतदारसंघ-वर्धा, दिवंगत खासदार प्रभा राव यांच्या कन्या
  3. अशोक चव्हाण, लोकसभा मतदारसंघ-नांदेड, दिवंगत केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र
  4. प्रिया दत्त, लोकसभा मतदारसंघ-मुंबई उत्तर मध्य, माजी खासदार सुनील दत्त यांची मुलगी
  5. मिलिंद देवरा, लोकसभा मतदारसंघ- मुंबई दक्षिण, माजी खासदार मुरली देवरा यांचा मुलगा
  6. विलास औताडे, लोकसभा मतदारसंघ-जालना, माजी आमदार केशवराव औताडे यांचा मुलगा

भाजप व काँग्रेसच्या या यादीवरून घराणेशाहीत भाजपने काँग्रेसलाही मागे टाकले असल्याचे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी ब्लॉग लिहून घराणेशाहीला पक्षात स्थान नसल्याचे म्हटले होते. मात्र, यादी पाहिल्यानंतर घराणेशाहीला स्थान दिले आहे की नाही, हे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com