Loksabha 2019 : देवेगौडा ढसाढसा रडले; भाजप म्हणाले हा तर 'ड्रामा'

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

देवेगौडा यांचे अश्रू पाहून देवेगौडा यांचे सुपूत्र एच डी रेवण्णा आणि नातू प्रज्वल रेवण्णा यांनाही रडू कोसळले. देवेगौडा यांचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे देवेगौडा यांचे रडणे हा तर 'ड्रामा' आहे, असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे.

बंगळूरूः जनता दलाचे (सेक्युलर) प्रमुख व माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा घराणेशाहीच्या आरोपावरून एका कार्यक्रमादरम्यान ढसाढसा रडले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे देवेगौडा यांचे रडणे हा तर 'ड्रामा' आहे, असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. घराणेशाहीचा होत असलेला आरोप होत असल्यामुळे देवेगौडा एका जाहीर कार्यक्रमात ढसाढसा रडू लागले. देवेगौडा यांचे अश्रू पाहून देवेगौडा यांचे सुपूत्र एच डी रेवण्णा आणि नातू प्रज्वल रेवण्णा यांनाही रडू कोसळले. देवेगौडा यांचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे भाजपने देवेगौडांच्या अश्रूंवर टीका करताना म्हटले आहे की, 'रडणे ही जरा कला मानली तर देवेगौडा आणि त्यांच्या कुटुंबियांनी यात प्राविण्य मिळवलेले आहे. आपल्या रडण्याच्या कलेने त्यांनी दशकांपासून जनतेला वेड्यात काढले आहे.'

लोकसभा निवडणुकीत देवेगौडा यांचे दोन्ही नातू निखिल कुमारस्वामी यांना मंड्या मतदार संघातून तर  प्रज्वल यांना हसन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे देवेगौडा कुटुंबीयांवर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप केला जात आहे. देवेगौडा हसन येथे ते प्रज्वल यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आले होते. घराणेशाहीच्या आरोपांवरच देवेगौडा आपली प्रतिक्रिया देत असताना त्यांना रडू कोसळले. जेडीएस समर्थकांनी त्यांना शांत होण्याची विनंती केली. देवेगौडा यांचे मोठे सुपूत्र आणि राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री एच डी रेवण्णा यांचा प्रज्वल हा मुलगा आहे. ते हसन मतदारसंघातून काँग्रेस-जेडीएसचे उमेदवार आहेत.

देवेगौडा कुटुंबीयांचे रडणे हे नाटक असल्याचा आरोप भाजपने केला आहे. रडणे ही कला मानली तर देवेगौडा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यात प्राविण्य मिळवले आहे. आपल्या रडण्याच्या कलेमुळे ते अनेक वर्षांपासून जनतेला वेड्यात काढत आहेत. निवडणुकीपूर्वी देवेगौडा आणि कुटुंबीय रडतात. निवडणुकीनंतर त्यांना मतदान केलेले कुटुंबीय रडतात, असा टोला कर्नाटक भाजपाने ट्विट करून लगावला आहे.

Web Title: Loksabha 2019 HD Deve Gowda, Son, Grandson Cry At Event, BJP Calls It Drama