Loksabha 2019 :फारूख अब्दुल्ला बाजी मारणार?

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 4 एप्रिल 2019

श्रीनगर - प्रतिष्ठेच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार फारूख अब्दुल्ला विजयाचा चौकार मारणार का, याची उत्सुकता आहे.  त्यांच्याविरोधात भाजपने खालिद जहाँगीर यांना तर ‘पीडीपी’ने आगा सैय्यद मोहसीन यांना रिंगणात उतरवले आहे.

श्रीनगर - प्रतिष्ठेच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार फारूख अब्दुल्ला विजयाचा चौकार मारणार का, याची उत्सुकता आहे.  त्यांच्याविरोधात भाजपने खालिद जहाँगीर यांना तर ‘पीडीपी’ने आगा सैय्यद मोहसीन यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचेच लक्ष असले तरी सामान्य मतदार मात्र पर्यटकांच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. 

एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असली आणि १८ एप्रिलला मतदान होणार असले तरी परिसरातील बहुतांश ठिकाणी एखाद-दुसरा अपवाद वगळता प्रचारफलक व पक्षांच्या झेंड्याचे अस्तित्व आहे. दुसरीकडे सामान्य विक्रेत्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत सर्वच घटकांचा पर्यटनवाढीसाठी आपापल्या परीने जे काही करता येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू असून, आगामी दोन महिने त्यांच्यासाठी त्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याचे जाणवले.

श्रीनगरवर सुरवातीपासून नॅशनल कॉन्फरन्स या प्रादेशिक पक्षाचेच वर्चस्व राहिले आहे. २०१४ च्या निवडणुकीत ‘पीडीपी’च्या तारिक हमीद कर्रा यांच्याकडून फारूख अब्दुल्ला यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, २०१७ च्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा दहा हजारांहून अधिक मताधिक्‍याने विजयी झाले. पुलवामा घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद येथे चालणार, ‘पीडीपी’ला मतदार पुन्हा संधी देणार, की फारूख अब्दुल्ला पुन्हा बाजी मारणार, याची उत्सुकता असेल.  दरम्यान, नऊ उमेदवारही येथे रिंगणात आहेत. 

किती होणार मतदान?
श्रीनगर परिसरातून फिरताना टॅक्‍सीवाल्यांसह विक्रेत्यांना निवडणुकीत फारसा रस नसल्याचे स्पष्टपणे जाणवले. ‘बहुतेक पंधराला मतदान असावे आणि होऊन किती होणार आहे मतदान? त्यापेक्षा पूर्वीसारखे ‘टुरिझम’ कसे वाढेल, यावर आमचा भर आहे,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Loksabha 2019 Shrinagar Lok Sabha Constituency