Loksabha 2019 : मोदी हे 'प्रधान प्रचार मंत्री' : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

नरेंद्र मोदी उद्या बुंदेलखंडच्या दौऱ्यावर येत असताना प्रियांका गांधी यांनी टीका केली.

बांदा (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "प्रधान प्रचारमंत्री' आहेत, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (मंगळवार) केली. ट्विटरवर त्यांनी म्हटले, की बुंदेलखंडमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रस्ते धुतले जात असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली जात आहे.

नरेंद्र मोदी उद्या बुंदेलखंडच्या दौऱ्यावर येत असताना प्रियांका गांधी यांनी टीका केली. आपल्या प्रधान प्रचारमंत्रींच्या स्वागतासाठी टॅंकरने रस्ते स्वच्छ केले जात आहेत. संपूर्ण बुंदेलखंडमध्ये दुष्काळाचे सावट असताना भाजपकडून पाणी वाया घालवत आहेत. हे खरोखरीच चौकीदार आहेत, की शहेनशाह जे की दिल्लीहून बुंदेलखंडमध्ये येत आहेत, असे प्रियांका यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी सभा होत आहे.

Web Title: Modi is Pradhan Prachar Mantri says Priyanka Gandhi