देशातील प्रत्येक घरात "मोदी लाट'- पंतप्रधान मोदींचा दावा 

देशातील प्रत्येक घरात "मोदी लाट'- पंतप्रधान मोदींचा दावा 

रतलाम ः देशात "मोदी लाट' नाही असा दावा दिल्लीतील पंडित करत आहेत. मात्र, प्रत्येक घरात "मोदी लाट' निर्माण होते आहे. लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची वाढलेली टक्केवारी पाहून अनेक जण चिंतेत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. 

मध्य प्रदेशातील रतलाम येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. "दिल्लीतील पंडित "मोदी लाट' नसल्याचा दावा करत आहेत. तशा बातम्या पेरल्या जात आहेत. सुरवातीला ते म्हणायचे की आता कुठलीही लाट नाही. मात्र, मतदानाची वाढलेली टक्केवारी पाहून त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पहिल्यांदाच मतदान करणारा तरुण वर्ग आणि देशातील माता, भगिनींनी आपल्या भावाला निवडून देण्याचा निश्‍चय केला आहे,'' असे मोदी म्हणाले. 

कॉंग्रेसचे वर्तन अहंकारी 
शीखविरोधी दंगलीच्या संदर्भात कॉंग्रेसचे नेते सॅम पित्रोडा यांनी केलेल्या विधानावरून मोदींनी आज पुन्हा टीका केली. पित्रोडा यांनी केलेले "झाले ते झाले' (हुआ तो हुआ) हे विधान कॉंग्रेसचे विचारधारा आणि अहंकार दर्शविते. त्याला प्रत्युत्तर म्हणून लोक "आता बास' असे म्हणत आहेत, असे मोदी म्हणाले. भोपाळमधील वायू गळती, 2-जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार, कोळसा गैरव्यवहार, नक्षलवाद्यांचे हल्ले अशा प्रत्येक वेळी "झाले ते झाले' असे कॉंग्रेस म्हणते, अशी टीका मोदींनी केली. 

मागील आठवड्यात एका मुलाखतीवेळी शीखविरोधी दंगलीबद्दल बोलताना "झाले ते झाले' असा शब्दप्रयोग पित्रोडा यांनी केला होता. त्यावर टीका झाल्यानंतर आपल्या विधानाबद्दल पित्रोडा यांनी माफीही मागितली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com