Election Results : येऊन येऊन येणार कोण? मोदींशिवाय आहेच कोण..! 

गुरुवार, 23 मे 2019

महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 346 जागांवर आघाडीवर होते.

लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 346 जागांवर आघाडीवर होते; तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ 85 जागांवरच आघाडी मिळविता आली. यामुळे देशात पुन्हा एकदा मोदींचीच सत्ता येणार, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. 

मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची जोडी रोखण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातील विरोधकांनी प्रचंड प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना काहीही यश आलेले दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीमध्ये दिसत नाही. 

या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मायावती-अखिलेश यादव यांनी परस्पर आघाडी करत कॉंग्रेसला धक्का दिला. त्यानंतर इतर राज्यांमध्येही कॉंग्रेसला आघाडीच्या पातळीवर फारसे यश मिळाले नाही. उमेदवार निवडतानाही कॉंग्रेसने अनेक ठिकाणी चालढकल केली. त्याचाही मोठा फटका पक्षाला बसल्याचे निकालामध्ये दिसत आहे. 

ताज्या बातम्या आणि विश्‍वासार्ह निकालांसाठी डाऊनलोड करा 'सकाळ'चे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi wave in India as NDA goes past majority mark in Lok Sabha 2019