Loksabha2019: उर्मिलाला हवीय मनसेची साथ

Loksabha2019: उर्मिलाला हवीय मनसेची साथ

मुंबई: काँग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साथ हवी आहे. उर्मिला मातोंडकरने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या उर्मिलाची भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात थेट लढत आहे. उत्तर मुंबईत मोठया संख्येने मराठी मतदार आहेत.

उर्मिला मातोंडकर आणि राज ठाकरे यांची जुनी ओळख आहे. राज ठाकरेंनी सर्व मनसे कार्यकर्त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही जाहीरपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करणार नाही. पण अप्रत्यक्ष मदत करु असे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. राज यांच्या आदेशानंतर मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे शनिवारी शिवाजीपार्कमध्ये काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा प्रचार करताना दिसले.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसला येथे तुल्यबळ उमेदवार सापडत नव्हता. उर्मिलाने या आठवडयात काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेच दोन दिवसात तिला उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com