Loksabha 2019 : मोदी म्हणतात, 'माझे नाव चौकीदार नरेंद्र मोदी'

Narendra Modi Changed his twitter account name as a Chowkidar Narendra Modi
Narendra Modi Changed his twitter account name as a Chowkidar Narendra Modi

'चौकीदार ही चोर है' ते 'मै भी चौकीदार' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्ष आणि जनतेकडून येणाऱ्या कमेंट्स त्यांनी जास्तच मनावर घेतल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून चक्क 'चौकीदार नरेंद्र मोदी' (Chowkidar Narendra Modi) असे ठेवले आहे!

एवढेच नव्हे तर मोदी यांची रेघ ओढत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्विटरवर आपापल्या नावापुढे 'चौकीदार' हा शब्द टाकला आहे. तसेच भाजप मधील इतर काही बड्या नेत्यांनीही आपल्या नावापुढे 'चौकीदार' असा उल्लेख केला आहे. 

जगात कुठेही काहीही घटना घडू देत, सर्वात जलद गतीने त्याचे पडसाद कुठे उमटत असतील तर ते आहे सोशल मीडिया. याचाच परिणाम म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मॅसेजेस, व्हिडीओज्‌ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण व्हॉट्‌सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकमध्ये उपलब्ध असलेल्या स्टेटसद्वारे सध्या 'चौकीदारही चोर है' विरुद्ध 'मैं भी चौकीदार' या मोहिमांमधील लढत चर्चेचा विषय ठरत आहे. 

याच पार्श्वभूमीवर आज मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळाने स्वतःला 'चौकीदार' म्हणवून घेतले आहे. पंतप्रधान मोदींच्या कामापासून खूश नसलेल्या व राहुल गांधी यांच्याशी प्रभावीत झालेल्या तरुणाईकडून सोशल मीडियावर 'चौकीदारही चोर है' असे स्टेटस ठेवताना आपले मत नोंदविले जाते आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांना समर्थन करणाऱ्या तरुणाईकडून 'मैं भी चौकीदार' असे स्टेटस ठेवले जात आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com