पंतप्रधान मोदींचा 'इंदिरा गांधी' पॅटर्न 

पंतप्रधान मोदींचा 'इंदिरा गांधी' पॅटर्न 

लोकसभा 2019 ः पटना- पटन्यातील गांधी मैदानातील सभेत मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची शैली वापरत जनतेला साद घातली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'विरोधक म्हणतात मोदींना हटवा. पण मी म्हणतो दहशतवाद हटवा. ते म्हणतात एकत्र येऊन मोदींना घालवा, पण मी म्हणतो चला एकत्र येवून भ्रष्टाचार मिटवू.'

'विरोधक म्हणतात...इंदिरा हटाओ, मी म्हणते गरिबी हटाओ,' असं इंदिरा गांधी आपल्या भाषणात म्हणत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आता विरोधकांवर निशाणा साधताना नरेंद्र मोदींनीही इंदिरा गांधींची ही स्टाईल वापरल्याचं पाहायला मिळाले.

दरम्यान, बिहारमधील सभेत मोदींनी विरोधकांच्या अनेक टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'आपका चौकीदार पुरी तरह से चौकन्ना हैं ,' असा विश्वास देत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा एनडीएला ताकद देण्याची साद जनतेला घातली. या सभेला मोदींसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एलजीपीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासह एनडीएचे अनेक मोठे नेतेही उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com