LokSabha 2019 : सामान्य चौकीदारांशी दिल्लीश्‍वर साधणार संवाद 

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 20) होळीच्या निमित्ताने देशभरातील 25 लाख रखवालदारांशी (चौकीदार) ऑडिओ ब्रिज यंत्रणेतून थेट संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे मोदी येत्या 31 मार्चला "मै हूँ चौकीदार' मोहिमेशी जोडलेल्या 500 ठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत करतील व त्यांना थपथही देववितील. राहुल गांधी यांच्या "चौकीदार चोर है' या आरोपाचे बूमरॅंग कॉंग्रेसवरच करण्यासाठी जय्यत तयारी केलेल्या भाजपने आता मोदींच्या संवाद कार्यक्रमांचा सिलसिला सुरू केला आहे. या निमित्ताने देशाचा चौकीदार कानाकोपऱ्यातील सामान्य चौकीदारांच्या व्यथावेदनांची दखल घेणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. 

"मै हूं चौकीदार' या मोहीमेला देशाच्या कानाकोपऱ्यातून व सर्व वर्गांतून थक्क करणारा पाठिंबा मिळत असल्याचा दावा पक्षाचे माध्यम विभागप्रमुख अनिल बलुनी यांनी केला. ते म्हणाले, की पहिल्या दोन दिवसांत 20 लाख लोकांनी या "हॅशटॅग'ने ट्विट केले व ती ट्विटस्‌ पाहणारांची संख्या (इम्प्रेशन) 1680 कोटी होती.
 
"चौकीदार चोर है' हा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपामुळे भाजप नेते अन्य विरोधी नेत्यांपेक्षा राहुल यांच्यावरच टीकेचा झोत ठेवताना आढळतात. प्रियांका वद्रा यांचे नाव न घेता रविशंकर प्रसाद म्हणाले की, हे आता सांगत आहेत की चौकीदार गरिबांचा नव्हे, तर श्रीमंतांचा असतो; पण जेव्हा हे सत्तेत होते तेव्हा त्यांनी याच गरीब देशवासीयांना व जनतेला 12 लाख कोटी रुपयांना चुना लावला. तेव्हा चौकीदाराची गरज कोणाला आहे व कोणाला नाही, हे वेगळे सांगायला हवे का? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com