LokSabha 2019 : प्रतिष्ठेच्या अस्कामध्ये नवा चेहरा; नवीनबाबू शब्दावर ठाम

naveen patnaik
naveen patnaik

भुवनेश्‍वर : लोकसभेच्या निवडणुकीत 33 टक्के महिला उमेदवारांची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एवढ्या महिला उमेदवार मिळतील का आणि त्यांची जिंकण्याची क्षमता असेल का, या शंका त्यामागे होत्या. मात्र, प्रतिष्ठेच्या अस्का मतदारसंघात नवा चेहरा देऊन नवीन यांनी सगळ्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे.
 
ओडिशातील बीजू जनता दलाचेही (बीजेडी) प्रमुख असलेल्या नवीन पटनायक यांनी हे अंदाज फोल ठरवले आहेत. लोकसभेच्या 21 पैकी नऊ जागांवरील उमेदवारी जाहीर झाले असून, त्यात कालिकेश देव वगळता आठ नवे चेहरे नवीनबाबूंनी दिले आहेत. त्यातील सुनिता बिस्वाल आणि चंद्रशेखर साहू हे "आयात' उमेदवार वगळता, 33 टक्‍क्‍यांच्या वचनाला पटनायक जागले आहेत. नऊपैकी कौसल्या हिकाका (कोरापूत), सुनिता बिस्वाल (सुंदरगड) आणि प्रमिला बिसोई (अस्का) या तीन महिलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. सगळ्यांत मोठा धक्का आहे तो अस्काचा. या मतदारसंघातून ओडिशाचे ज्येष्ठ दिवंगत नेते बिजू पटनायक यांनी तीनदा विजय मिळविला आहे. एवढेच नव्हे, तर खुद्द नवीन पटनायक यांनी त्यांच्या वडिलांच्या या मतदारसंघातून सुमारे वीस वर्षांपूर्वी राजकीय कारकी सुरू केली आहे. कौसल्या या कोरापूतचे माजी खासदार झिना हिकाका यांच्या पत्नी आहेत, तर सुनिता या माजी मुख्यमंत्री हेमानंद बिस्वाल यांच्या कन्या आहेत. या सगळ्यांपेक्षा प्रमिला यांची कहाणी वेगळी आहे. गंजम जिल्ह्यातील नलंबता येथील सत्संग बचत गटाच्या माध्यमातून त्या पुढे आल्या आहेत. हा बचत गट शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवितो. मात्र, 2011 मध्येच नवीनबाबूंनी महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या "मिशन शक्ती' या कार्यक्रमांतर्गत विविध बचत गटांना प्रोत्साहन देण्यात आले असून, त्यात सहा लाख महिला आहेत. एकप्रकारे पटनायक यांनी स्वतःची भक्कम मतपेढीच तयार केली आहे. 

साध्या कुटुंबातील प्रमिला 
प्रमिला बिसोई या अत्यंत साध्या कुटुंबातील आहेत. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी शौचालये, पिण्याचे शुद्ध पाणी, वृक्ष ागवड, लसीकरण आदी उपक्रमांद्वारे महिलांमध्ये जागृती केली आहे. मुलांनी शाळेत जावे म्हणूनही त्या प्रयत्नशील असतात. त्यांच्यामुळे चेरिमारिया हे गाव हागणदारीमुक्त झाले आहे. वृक्ष लागवडीसाठी प्रमिला यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल सरकार दरबारीही घेतली गेली असून, प्रकृती बंधू आणि प्रकृती मित्र हे सन्मान त्यांना देण्यात आले आहेत. बिसोई कुटुंबाकडे एक एकरापेक्षाही कमी शेती असून, त्यात भात व रागीची लागवड त्या करतात. या कुटुंबाचे मासिक उत्पन्न जेमतेम दहा ते बारा हजार रुपये आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com